आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉकटेल पार्टी ते रिसेप्शनपर्यंत, वेडिंग सेरेमनीमध्ये असेल भारतीचा हा ड्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारती सिंहने तिचे वेडिंग आउटफिटचे फोटोज शेअर केले. - Divya Marathi
भारती सिंहने तिचे वेडिंग आउटफिटचे फोटोज शेअर केले.

मुंबई - कॉमेडियन भारती सिंहचे 3 डिसेंबरला लग्न होऊ घातले आहे. भारती तिच्या बॉयफ्रेंड हर्ष लिम्पाचियासोबत गोव्यात विवाहबद्ध होणार आहे. भारतीच्या लग्नाचे विविध विधी सुरु झाले आहेत. सोमवारी तिच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. मुंबईतील मलाड येथे हा सोहळा अतिशय उत्साहात झाला. यावेळी भारतीने लाल रंगाचा लहेंगा नेसला होता. यामध्ये ती गॉर्जियस दिसत होती. डिझायनर नीता लुल्लाने तिच्यासाठी हा लहेंगा डिझाइन केला होता. त्यासोबतच भारतीचे विविध ड्रेसेसमधील फोटो समोर आले आहेत. यात हळदीपासून मेहंदी, कॉकटेल पार्टी आणि रिसेप्शनमध्ये ती कोणता ड्रेस वापरणार आहे हे लक्षात येते. 

 

वेडिंग फंक्शनमध्ये असतील हे ड्रेसेस.. 
- मुंबईत 29 नोव्हेंबरला झालेल्या माता की चौकीमध्ये भारतीने व्हाइट कलरचा लेंथ फ्लोअर अनारकली सूट परिधान केला होता. 
- त्यासोबत तिने रेड कलरचा दुपट्टा कॅरी केला होता. 
- हळदीसाठी भारतीने यलो कलर फ्रिल गाऊनची निवड केली आहे. तर, मेहंदीसाठी तिने ग्रीन कलरचा स्कर्ट अँड क्रॉप टॉपला पसंती दिली आहे. यावरती मिरर वर्क करण्यात आले आहे. 
- कॉकटेल पार्टीमध्ये भारती डार्क रेड कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान करणार आहे. 

 

असे आहे भारतीचे वेडिंग कार्ड 
पुनीत गुप्ताने डिझाइन केलेले भारती-हर्षच्या लग्नाचे कार्ड व्हाइट कलरच्या वुडन बॉक्समध्ये ठेवलेले आहे. त्यावर निळ्या रंगाची लेस आहे. कार्डच्या आत भारती-हर्षचा फोटो आहे, त्यासोबत वेडिंग डेट आणि व्हेन्यू लिहिला आहे. या कार्डच्या एका पेजवर भारतीने हर्षला खांद्यावर उचलून घेतलेला फोटो आहे, त्यावर लिहिले आहे 'दुल्हा हम ले जाएंगे, सेव्ह द डेट'.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हळदी, मेहंदीपासून कॉकटेल पार्टीपर्यंतचे आऊटफिट... 

बातम्या आणखी आहेत...