आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका सुंदर सजविला हर्ष-भारतीच्या लग्नाचा मंडप, विंटेज कारमध्ये हातात चांदीचे नारळ घेऊन आला नवरदेव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया आज विवाहबंधनात अडकणार आहेत. गोवा येथील रिसॉर्टमध्ये त्यांच्या लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. आज लग्नाच्या दिवशी हर्ष एका विंटेज कारमध्ये बसून मंडपात आला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबियही होते. हर्षच्या हातात एक चांदीचे नारळही होते. लग्नाचा मंडप आणि रिसॉर्ट खूप सुंदर पद्धतीने विविध फुलांनी सजविण्यात आला. लग्नानंतर भारती-हर्षचे रिसेप्शनही येथेच होणार आहे. 

 

या टीव्ही सेलेब्सने लावली उपस्थिती..
भारती-हर्षच्या लग्नाला जय भानुशाली, माही वीजे, जिया महक डान्स करताना दिसले. गुजराती आणि पंजाबी पद्धतीने लग्नाचे सर्व विधी पार पडणार आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, हर्ष-भारतीच्या वेडींग वेन्यूचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...