आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन भारतीने सेलिब्रेट केले ब्रायडल शॉवर, बघा भावी नव-यासोबतचे रोमँटिक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या अफलातून कॉमेडीने लोकांना पोट धरून हसायला लावणारी कॉमेडियन भारती सिंग लेखक हर्ष लिंबाचियासोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी हर्ष आणि भारती विवाहबद्ध होणार आहेत. अलीकडेच भारतीचे ब्रायडल शॉवर झाले. यावेळी दोघांचेही कुटुंबीय एकत्र आले होते. यावेळी भारतीने निळ्या रंगाचा गाऊन घातला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या दोघांनी प्री- वेडिंग फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये दोघांच्या लग्नाची तारीखही कळली. प्री- वेडिंग फोटोशूटमध्ये भारतीने तिच्या इन्स्टावर फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये म्हटले होते, की मी माझ्या आयुष्यात जर काही चांगले काम केले असेन तर हेच की मी माझं हृदय तुला दिलं. भारतीने या फोटोमध्ये हर्षला खांद्यावर उचलून घेत ‘दुल्हा हम ले जाऐंगे’ असं म्हटलंय.
 
लग्नानंतर भारती आणि हर्ष 20 ते 25 दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. ते हनिमुनला युरोपला जाणार असल्याचे म्हटले जाते. यात ग्रीस, स्पेन, बार्सेलोना, इटली आणि इतर देश फिरणार आहेत.

पाहुयात, भारतीच्या ब्रायडल शॉवरसोबतच प्री वेडिंग फोटोशूटची खास झलक... 
बातम्या आणखी आहेत...