आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhootnath Returns' On The Set Of Tarak Mehta Ka Ooltah Chashmah

'तारक मेहता...'च्या सेटवर अवतरले 'भूतनाथ', बिग बींनी केले एन्जॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानायक अमिताभ बच्चन सध्या आपल्या 'भूतनाथ रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. काल (8 एप्रिल) या संबंधीत ते सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. गोकुळधाम सोसायटीच्या सदस्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी दया जेठलाल गडा (दिशा वकानी), टप्पू (भव्य गांधी), जेठलाल (दिलीप जोशी), चेपक लाल गडा (अमित भट्ट), तारक मेहता (शैलेष लोढा), अंजली (नेहा मेहता), कृष्णन सुब्रह्यण्यम अय्यर (तनुज महाशब्दे), बबिता (मुनमुन दत्ता), आत्माराम भिडे (मंदर चंदावरकर), माधवी (सोनालिका जोशी), सोनू (झील मेहता), रोशन सिंह सोढी (गुरुचरण सिंह), रोशन कौर (दिलनाज श्रॉफ), गोगी (समय शाह), डॉ. हंसराज हाथी (आजाद कवि), कोमल (अंबिका रंजनकर), गोली (कश शाह), पत्रकार पोपट लाल (शाम पाठक) आणि अब्दुल (शरद सांकला) यांच्यासोबत त्यांनी खूप एन्जॉय केला. सोबतच, सिनेमाचा बालकलाकार पार्थ भालेरावसुध्दा गोकुळधाम सोसायटीमध्ये उपस्थित होता.
नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 11 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात अमिताभ बच्चन आणि पार्थ भालेराव या दोघांव्यतिरिक्त बोमन ईराणी, अनुराग कश्यप, संजय मिश्रा, बिजेंद्र काला, उषा नाडकर्णी आणि उषा जाधव यांच्यासुध्दा सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'तारक मेहता...'च्या स्टार्ससोबत बिंग बींची धमाल...