आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकांच्या दुनियेत आता अमिताभ बच्चन यांची एन्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कौन बनेगा करोडपती' या मालिकेतून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारे बिग बी अमिताभ बच्चन आता आणखी एका टीव्ही मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका नव्या को-या मालिकेतून बिग बी अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या चाहत्यांना भेटणार आहेत. ही नवी मालिका लवकरच सोनी चॅनलवर सुरू होणार आहे.
वाहिनीने या मालिकेबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे. अद्याप या मालिकेच नाव, यातील कलाकार सगळे काही वाहिनीने गुलदस्त्यात ठेवले आहे. पण ही मालिका सामाजिक विषयांवर आधारित असेल असे समजते.
हा एक हटके, संपूर्णपणे वेगळा विषय असल्यामुळे आपण ही मालिका स्विकारली असल्याचे बिग बीनीं सांगितले. अनुराग कश्यप ही मालिका दिग्दर्शित करणार आहेत.
चला तर म्हणजे छोट्या पडद्यावर मालिकेच्या माध्यमातून बिग बींना भेटायला त्यांचे चाहते आतुर असणार हे नक्की.