आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... सिनेसृष्टीतील दिग्गज TVवर आहेत फ्लॉप! कॉमेडी शोजलादेखील मिळत नाहीये TRP

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेताऱ्यांचे रिअॅलिटी शो टीव्हीवरील रेटिंगमध्ये खूप मागे आहेत. आश्चर्य म्हणजे टीव्हीवरील टॉप-5 कार्यक्रमांमध्येही त्यांचे नाव नाही. काही लाख रुपये कमावणाऱ्या सास-बहूंनी यांची लोकप्रियता खुजी ठरवली आहे. विनोदी कार्यक्रमांमध्ये प्रमोशनसाठी येणारे स्टार्स टीआरपी वाढवू शकले नाहीत. अशा वेळी शाहरुख, दीपिका, काजोल मालिकांचा आधार घेत आहेत. अमिताभ बच्चन आयुष्य सेलिब्रेट करणारा एक कार्यक्रम करत आहेत. सलमानचा रिअॅलिटी शो पाच वर्षांपासून सुरू आहे. फरहान अख्तरचा सेलिब्रिटी डान्स शो काही दिवसांपूर्वीच प्रसारित झाला. सेलेब्सचा धोकादायक स्टंट शो अर्जुन कपूर आणत आहे. अरबाज खानही कपल्सवर आधारित कार्यक्रम पत्नी मलायकासोबत होस्ट करेल. साजिद खान, विवेक ओबेरॉय, सोनाली बेंद्रे मुलांच्या अभिनयावर आधारित कार्यक्रमामध्ये दिसतील. टीव्हीवर एवढे मोठे सिनेतारे आहेत येतील, पण प्रेक्षकांचा त्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे.
फॅमिली शोज ठरत आहेत वरचढ
सलमानचा शो सुमारे सात आठवड्यांपासून सुरू आहे, परंतु टीआरपी 1.2 ते 1.8 दरम्यानच राहिला. अमिताभ यांचा शो सहा आठवड्यांमध्ये 0.8 ते 1 च्या रेटिंगमध्ये अडकला आहे. फरहानच्या शोची टीआरपी 2 ते 2.8, कृष्णा अभिषेक भारती सिंहच्या कॉमेडी शोची 2 ते 2.5, अर्चना पूरणसिंह मुबीनच्या कॉमेडी शोची टीआरपी 0.5 ते 1 दरम्यान राहिली आहे. या कार्यक्रमांदरम्यान प्रसिद्ध सिनेतारे आपले चित्रपट प्रमोट करण्यासाठी येत आहेत तरीही रेटिंग वाढताना दिसत नाही. या सर्वांना सास-बहू आणि फॅमिली पॉलिटिक्स दाखवणारे शो वरचढ ठरत आहेत.
Top 5 मध्ये मालिकांना स्थान
अनेक महिन्यांपासून सुपरस्टार्सचा कोणताच शो टॉप-5 मध्ये आलेला नाही. पाचही स्थानी सास-बहूंच्या मालिका आहेत. गेल्या आठवड्यात कोकिळा-गोपी बहू, रमन-इशिता, प्रज्ञा-अभी, सूरज-संध्या, स्वरा-रागिणी, सिमर-रोली या जोड्या प्रेक्षकांच्या आवडत्या होत्या. वीकेंडमध्ये सलमानसारख्या स्टार्सच्या कार्यक्रमांना टक्कर देण्यासाठी इच्छाधारी नागीणचा शोदेखील आला आहे. या शोने 4.5 एवढी टीआरपी मिळवली आहे. जवळपास सर्वच सास-बहूच्या मालिकांमध्ये भूत, प्रेत, पुनर्जन्म नागीणचे ट्रॅक चालत आहेत. सलमान, साजिद, अरबाज आणि अर्जुनच्या कार्यक्रमामध्येही भीतीच्या फॅक्टरला प्राधान्य दिले जाईल. एकूणच मोठ्या स्टार्सचे छोट्या पडद्याच्या सास-बहूंनी काहीच चालू दिले नाही.
मालिकांमध्ये सुरु झाले सिनेमांचे प्रमोशन
सिनेतारे चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सास-बहूच्या मालिकांमध्ये जात आहेत. स्वत: सलमान 'बजरंगी भाईजान'च्या प्रमोशनसाठी रमण आणि इशिताच्या घरी गेला होता. शाहरुख काजोलही कोकिळाबेन गोपी बहूच्या मेलोड्रामामध्ये पोहोचले आहेत. या डेली सोप्सची रेटिंग एवढी जास्त आहे की, प्रोडक्शन हाऊस चित्रपटांचा प्रचार टॉप-5 मालिकांमध्ये करत आहेत. प्राइम टाइमला मालिका पाहणाऱ्या महिला आणि कुटुंब सिनेमागृहांमध्ये आपले प्रेक्षक बनतील, असे त्यांना वाटत आहे. टीव्हीला समर्पित प्रेक्षकांचा हा मोठा वर्ग महानगरांतील जुन्या क्षेत्रांत राहणारे कुटंब 2, टियरच्या शहर-गावांमधील लोक आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, किती राहिला रिअॅलिटी शो आणि कॉमेडी शोजचा TRPचा आकडा...
बातम्या आणखी आहेत...