Home »TV Guide» Big Boss 11 Puneesh Sharma Asks Bandgi Kalra To Remove Her Clothes

'बिग बॉस-11'मध्ये पुनीशने पुन्हा हद्द पार केली, बंदगीला म्हणाला - 'आता कपडे काढ'

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 12:48 PM IST

  • सलमानने या दोघांना वॉर्निंग दिली आहे.
मुंबई- बिग बॉस-11मध्ये रोज काही ना काही नवीन कॉन्ट्रव्हर्सी ऐकायला मिळत आहे. पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा या सीजनमधील असे कंटेस्टंट आहेत ज्यांच्यामुळे घरातील सर्वच त्रस्त आहेत. एवढेच नाही तर शोचा होस्ट सलमान खानही त्यांच्यामुळे परेशान आहे. 'वीकेंड का वार'मध्ये सलमानने दोघांचा एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये दोघे एकमेकांच्या फार जवळ गेल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये पुनीश, बंदगीला कपडे उतरवण्याचे सांगतानाही ऐकायले येते.
सलमानने दिली वॉर्निंग
- बिग बॉसच्या या सीजनमध्ये प्रत्येक कंटेस्टंट चर्चेत राहाण्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे दिसते.
- सलमान खानने वॉर्निंग दिल्यानंतरही काही कंटेंस्टंट आपले चाळे थांबवायला तयार नाहीत.
- यावेळी 'वीकेंड का वार'मध्ये सलमानने पुनीश आणि बंदगीचा एक व्हिडिओ दाखवला. यामध्ये रात्रीच्यावेळी दोघे एका सोफ्यावर दिसले. दोघेही एकमेकांना बारीक आवाजात काही सांगत होते, त्यासोबत हातवारे करुनही एकमेकांसोबत संवाद साधत होते.
- सलमानने त्यांचे हे चाळे नॅशनल टीव्हीवर सुरु असल्याची त्यांना आठवण करुन दिली. ते जे काही करत आहेत ते घरातील बाकिचे सदस्य आणि टीव्हीवर लाखो दर्शक पाहात असल्याचे सांगितले. असे कृत्य करुन घरातील वातावरण खराब करु नये असे सलमानने त्यांना ठणकावले.
- घरात हिना खानपासून अर्शी खानपर्यंत सर्वच यांच्या रोमान्सची रसभरतीच वर्णने एकमेकांना सांगताना दिसत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय करत होते पुनीश - बंदगी

Next Article

Recommended