आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस-7 मधील सर्वांत शांत वाटणारा संग्राम शोच्या फायनलपर्यंत पोहोचला आहे. शोच्या विजेतेपदाचा तो मुख्य दावेदार मानला जातो. आज आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
लहानपणीच संग्रामला काही व्याधींनी ग्रासले होते. डॉक्टरांनी तर या व्याधीवर उपाय नसल्याचे जाहीर केले. आणि मरणानंतरच हे आजार जातील असे स्पष्ट केले. परंतु जिद्दी संग्रामने घरगुती उपाय केले. आणि आपली तब्बेत ठणठणित केली. संग्रामसमोर लकवा आणि गाठी यासारख्या व्याधींनी हार पत्करली. सोबतच त्याने आखाड्यामध्ये जाऊन शरीरयष्टी कमवली. लवकरच त्याची उत्कृष्ठ पहिलवान अशी वेगळी ओळख बनली. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तो कुस्तीपटू म्हणून गाजला.
2011 मध्ये त्याने मि. इंडिया हा पुरस्कार मिळविला. एवढेच नाही तर फेबु्वारी 2014 मध्ये होणा-या पॅरालॉम्पीक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. त्याने असे अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. आगामी 'बायोपिक' या चित्रपटात तो मल्ल दारासिंगच्या रुपात दिसणार आहे. संग्राम बिग बॉसची पूर्व स्पर्धक पायल रोहतगीचा ब्वॉयफ्रेंड आहे. तिच्यासोबत काही बोल्ड फोटो शुट केले होते म्हणूनही तो चर्चेत होता.
पुढील स्लाइडवर बघा संग्रामची काही खास छायाचित्रे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.