आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 7 : दुखण्याने त्रस्त रजत, आली मुलीची आठवण, झाला होमसिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या सातव्या पर्वात सेलिब्रिटी स्पर्धक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. तर दुसरीकडे रजत रवैलला घरातील वातावरण सुट होताना दिसत नाहीये. घरातील वातावरणामुळे रजत डिप्रेशनमध्ये असून त्याला आपल्या मुलीची आठवण येत आहे. रजतने विशींग वॉलच्या माध्यमातून आपल्या मुलीशी भेटण्याची इच्छा बिग बॉसकडे व्यक्त केली आहे. सलमानबरोबरच घरातील इतर सदस्यांनी रजतला सांत्वना देत त्याची मुलगी ठिक असल्याचे त्याला सांगितले.
यादरम्यान रजतला प्रकृतीसंबंधी निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करावा लागला. रतन तब्बल तासभर दुखण्यामुळे रडताना दिसला. त्याला थोडावेळ बरे वाटले, मात्र पुन्हा परिस्थिती पहिल्यासारखी झाली. त्याला डॉक्टरांनाही दाखवले गेले. डॉक्टरांच्या मते, रजत एकदम फिट असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे. इतकेच नाही तर रजने आपली बॅग पॅक करुन शो सोडण्याच्या मार्गावर होता.
रजतला दुखण्यामुळे तासभर रडताना बघून एंडी आणि गौहरने आपापले मत व्यक्त केले. दोघांच्या मते, रजत नाटक करत असून इतरांना आपल्याकडे आकर्षित करतोय.
अजून काय सुरु आहे बिग बॉसच्या घरात, जाणून घेण्यासाठी बघा 'बिग बॉस 7' सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता...