(फाइल फोटो- गुरमीत राम रहिम सिंह)
नवी दिल्ली- टीव्ही शो '
बिग बॉस 9'मध्ये स्पर्धक म्हणून धर्मगुरुपासून अभिनेते झालेले गुरमीत राम रहिम सिंह यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यांनी मान्य केले, की शोच्या निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र राम रहिम यांनी बिग बॉसमध्ये सामील होण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. तसेच, राधे माँने
फेसबुकवर 'बिग बॉस'मध्ये सामील होण्याच्या अफवांचे खंडन केले आहे.
काय म्हणाले बाबा राम रहिम?
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंह यांचा 'MSG 2' हा आगामी सिनेमा 18 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 'MSG 2'च्या म्यूझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये त्यांना 'बिग बॉस'विषयी विचारण्यात आले. त्यांनी यावर सांगितले, 'हो, शोसाठी मला अॅप्रोच करण्यात आले, परंतु मी त्यांना सांगितले, की मला दररोज फॉलोअर्सना भेटण्यासाठी 2-3 तास घराबाहेर जाऊ दिल्यास मी शोविषयी विचार करेल, मात्र अद्याप काहीच फायनल झालेले नाहीये.' 'बिग बॉस'मध्ये सर्व स्पर्धकांना तीन महिने एकाच घरात राहावे लागते, त्यांना घराबाहेर जाण्याची परवानगी नसते. सर्व स्पर्धक प्रत्येक क्षणाला कॅमे-याच्या नजरेत असतात.
राधे माँन काय सांगितले?
दुसरीकडे, राधे माँच्या फेसबुक पेजवर राधे माँच्या वकिलांकडून एक पब्लिक नोटीस पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे, की राधे माँ 'बिग बॉस'मध्ये सहभाग घेत नाहीये. मागील दिवसांत बातमी आली होती, की राधे माँ 'बिग बॉस'मध्ये जाऊ शकते. मागील एका महिन्यापासून राधे माँ वादांमुळे चर्चेत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, राधे माँच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलेली पब्लिक नोटीस...