आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Boss Analysis : प्रणित V/S गौतम-डिआंड्रा, वादाला फुटले तोंड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - बिग बॉसमधील स्‍पर्धक)
मुंबई - 'बिग बॉस'च्या घरात तिस-या दिवशी स्‍पर्धकांमधील वातावरण तापणार असल्‍याचा अंदाज वर्तवण्‍यात आला होता. अगदी तसेच झाले आहे. गौतम गुलाटीने प्रणितला फुटेज आर्टिस्‍ट संबोधून वादाला तोंड फोडले आहे. तसेच सर्वांत कमकूवत माणल्‍या जाणा-या आणि 'आउट ऑफ गेम' परफॉर्म करणा-या नताशाला सर्वच स्‍पर्धकांनी लक्ष्‍य आहे.
आगामी प्रोमो खुपच मनोरंजक आणि मजेदार असल्‍याचे भाकित वर्तवण्‍यात येत आहे. ज्‍यामध्‍ये प्रनीत, गौतम गुलाटीला फुटेज आर्टिस्‍ट म्‍हणून भडकवत आहे. आजचा शो नॉमिनेशन शिवाय जास्‍त मनोरंजक वाटला नाही. शो ची खरी मजा पाचव्‍या दिवशी येणार आहे.'आउट ऑफ गेम' नाही चालणार
नताशाला सहा जणांनी नॉमिनेट केले होते. यावरुन असे स्‍पष्‍ट होते की, 'नताशा इतर स्‍पर्धकांच्‍या मानाने कमकूवत आहे'. खरे तर तिला टारगेट केले जात होते. परंतु तिला काही कळत नव्‍हते. यावरुन हेच स्‍पष्‍ट होते, की जो तुल्‍यबळ स्‍पर्धक आहे त्‍याला कोणी टारगेट करत नाही.


नताशा नंतर टीकेच्‍या भक्षस्‍थानी होती ती म्‍हणजे सुकिर्ती. कारण सुकिर्ती प्रॉब्‍लेम क्रिऐट करु शकते. नताशाला सर्वांनी जेवणाच्‍या समस्‍येवरुन नॉमिनेट केले होते.

उपेन, मिनिषा आणि सोनीचा सेफ गेम
उपेन, मिनिषा लांबा आणि सोनी यांना कोणीच नॉमिनेट केले नाही. याची कारणमिमांसा करताना असे स्‍पष्‍ट होते की, या तिघांमध्‍ये चांगला ताळमेळ आहे. शिवाय या तिघांपासून कोणाला भीती वाटत नसेल. परंतु खरा विचार केला तर हे तिघेसुध्‍दा अजून आपले रंग दाखवायला तयार नाहीत.

प्रणित विरुध्‍द डिआंड्रा-गौतम
प्रणित भट्ट उर्फ शकुनी मामा पहिल्‍या दिवसापासूनच विरोधक बनला आहे. त्‍याने गौतमला फुटेज आर्टिस्‍ट म्‍हणून भडकवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. तसेच गौतमनेही त्‍याचे चोख प्रत्युत्तर दिले आहे. खेळामध्‍ये उत्‍तरोत्‍तर मजा येणार आहे.

सिक्रेट सोसायटीची दादागिरी
सध्‍या सिक्रेट सोसायटीचे सदस्य सर्वांच्या हालचाली पाहत आहेत. ती प्रत्यक्ष खेळात उतरतील तेव्हा अनेकांची गुपिते समोर येतील. खेळाच्‍या पाचव्‍या दिवशी ती एकमेकांना नॉमिनेट करतील. उत्‍कंठावर्धक बाब ही आहे की, सिक्रेट सोसायटीमध्‍ये कोण आहे याबद्दल कुणालाच माहिती नाही. आर्य बब्‍बर सिक्रेट सोसायटीच्‍या विरोधात बोलला मात्र त्‍याच्‍या बोलण्‍यात तेवढा जोर दिसला नाही.
नाही चालणार बॉसगिरी
गौतम आणि प्रणित हे दोघे असे स्‍पर्धक आहेत की, भावना व्‍यक्‍त करताना लाजत नाहीत. परंतु दोघेही सध्‍या सोबत नाहीत. परंतु पुढील एपिसोडमध्‍ये ते एकत्र येवू शकतात. चौथ्‍या दिवशी करिश्‍माला 'क्‍वीन ऑफ चालूगिरी' आणि 'दी बॉस'ची उपाधी देण्‍यात आली आहे.

सोनीचे गोड गोड बोलणे
सोनी करिश्‍माशी जवळीक साधत आहे. जेणेकरुन करिश्‍माच्‍या नजरेतून ती गेम समजून घेण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

आजचा एपिसोड कसा वाटला? याविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्‍समध्‍ये जरुर नोंदवा.
या स्‍पर्धकांनी केले दोन हाउसमेट्सला नॉमिनेट:

करिश्मा: नताशा आणि सुकिर्ती
डिआंड्रा: सोनाली राउत आणि प्रणित
मिनिषा लांबा: नताशा आणि सोनाली राउत
उपेन: सुकिर्ती आणि नताशा
सोनी: नताशा आणि सोनाली राउत
प्रणित: डिआंड्रा आणि सुकिर्ती
आर्य बब्बर: सोनाली राउत आणि नताशा
गौतम गुलाटी: प्रनीत आणि सुकिर्ती
सुशांत दिग्विकर: आर्य बब्बर आणि गौतम
सुकृति: नताशा आणि प्रणित
सोनाली राउत: डिआंड्रा आणि आर्य बब्बर
नताशा: सुकिर्ती आणि करिश्मा
सीक्रेट सोसाइटी: सोनाली, गौतम
पुढील स्‍लाइडवर पाहा, BIGG BOSS-8 च्‍या चौथ्‍या दिवसाची छायाचित्रे...