आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Big Boss Analysis: Salman Khan Fun At Sunday Ka Vaar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Boss Analysis: सलमानच्या धमाल-मस्तीनंतर दिसणार गौतमचा रुद्रावतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान आणि सोनाली राऊत)
मुंबई: 'बिग बॉस'मध्ये 'संडे का वॉर'खूपच मनोरंजक होता. परंतु 'संडे का वार' एपिसोड पुढील दिवसांत हाउसमेस्ट्सच्या 'वॉर'ची कहानी व्यक्त करून गेला. सलमान खानने शाहिद कपूर आणि श्रध्दा कपूरसोबत नाचला, धमाल केली. परंतु जाता-जाता सोनालीच्या निमित्ताने घरात दिवसेंदिवस होणा-या राजकारणाची झलक दाखवून गेला. तुम्ही प्रमोजमध्ये पाहिले असेलच... गौतम एका टास्कमध्ये कसा भडकला होता. त्यावेळी आम्ही सांगितले होते, की गौतमच मारेल... माहिती आहे. टीव्हीवर गौतम प्रेक्षकांसमोर त्याच्या हिरोइज्मवर कसा दाग लागलेला बघू शकतो. आजच्या एपिसोडसाठी 3 स्टार आउट ऑफ फाइव्ह... इतर गोष्टी पुढे सांगण्यात आल्या आहेत.
कारल्याचा ज्यूस नव्हे मनाचा कडवटपणा
रविवारच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिले, की 'हैदर'च्या प्रमोशनसाठी शाहिद आणि श्रध्दा यांनी 'बिग बॉस'च्या घरात हजेरी लावली होती. दोघांनी हाऊसमेट्सना काही टास्कसुध्दा दिले. टास्कच्या निमित्तानेच का होईना पण गौतमने त्याच्या मनातील गोष्ट व्यक्त केली. गौतम आणि सुकिर्तीचे घरात कधीच पटले नाही. त्यामुळे शाहिदने सुकिर्तीला कारल्याचे ज्यूस पाजण्यास सांगितले. गौतमने काहीही विचार न करता तिला ते ज्यूस पाजले.
आता हाऊसमेट्सवर आली बिस्मिल-बिस्मिलची वेळ
शाहिद आणि श्रध्दा त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन करून निघून गेले. पण आता बिस्मिल-बिस्मिल करण्याची वेळ स्पर्धकांवर आली आहे. सोनाली घरातून बाहेर झाली आहे. सलमानने तिला सुकृती आणि सोनी सिंहच्या गॉसिपचे फुटेज दाखवले. त्यानंतर घरातील सदस्यांशी बातचीत केली. त्यामध्ये सोनालीने सांगितले, की तिने गॉसिप ऐकले आहेत. मात्र सुकिर्ती आणि सोनीला त्याचा जराही फरक पडला नाही. परंतु पुढे त्या दोघी आता घरातील सदस्यांच्या नजरेत राहतील. तसेच, घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्याशी काही खासगी गोष्टी शेअर करण्यास हजारदा विचार करतील.
सलमानची 'मस्ती की पाठशाला'
सलमान खान प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांना डबल डोज देण्यासाठीच येतो. सोबतच, काही हिंट्ससुध्दा देतो. सोनालीने गौतमला वागण्याची पध्दत शिकवण्याच्या गोष्टीवरून सलमाननेही खिल्ली उडवली. घरातील सदस्यांसोबत बातचीत करताना सलमानच्या बोलण्यात थोडे इशारे असतात.
गौतम आला नजेरत
आपल्या अंहकाराने गौतम हळू-हळू हाऊसमेट्सच्या नजरेत येऊ लागला आहे. सुरुवातीपासूनच गौतमचा नाट्यमय स्वभाव हाऊसमेट्सच्या लक्षात यायला लागला आहे. पुढील काही एपिसोड्समध्ये गौतम 'बिग बॉस'च्या टास्कवर आक्रमक स्वरुपात दिसून येईल. गौतमची ही वागणूकच हाऊसमेट्सच्या नजरेत आली आहे. परंतु तुमचे मनोरंजन वाढेल हे नक्की.
करिश्मा, आर्य, प्रनीत आणि उपेन
'बिग बॉस'च्या घरात यावेळी जे मनोरंजन करू शकतात त्यांच्यात, करिश्मा तन्ना, आर्य बब्बर, प्रनीत भट्ट आणि उपेन पटेल सामील आहे. पुढे सिक्रेट सोसायटीचे इतर दोन सदस्य दीपशिखा आणि प्रीतमच्या येण्याने त्यांचा पक्ष डगमगू शकतो. दीपशिखा आणि प्रीतम दोघे सिक्रेट सोसायटीत एकत्र काम करत आहेत. याचा नमूना पुनीत इस्सरला सिक्रेट सोसायटीमधून बाहेर काढल्यानंतर तुम्ही पाहिला असेलच. आता दोघे हाऊसमेट्सची कशाप्रकारे विभागणी करतात हे बघणे रंजक ठरेल. 'बिग बॉस'ची गाडी जशी-जशी पुढे जात आहे, तसा-तसा हाऊसमेट्ससह प्रेक्षकांचीही उत्सूकता वाढत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या घरातील काही निवडक छायाचित्रे...