आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'माझे आजोबा कॅरेक्टरलेस, केली होती 18 लग्ने' - अर्शी खानचा धक्कादायक खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः बिग बॉसच्या अकराव्या पर्वातील स्पर्धक आणि वादग्रस्त मॉडेल अर्शी खानने स्वतःच्या आजोबांना चारित्र्यहिन म्हणून संबोधले आहे. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये अर्शीने खुलासा केला, की तिच्या आजोबांनी 18 लग्ने केली होती आणि त्या लग्नांपासून त्यांना 12 मुले झाली होती. इतकेच नाही तर अर्शी पुढे म्हणाली होती, की ती आणि तिचे कुटुंबीय मुळचे अफगाणिस्तानचे आहेत, पण आता ते भोपाळच्या जहांगीराबाद येथे वास्तव्याला आहेत.


अर्शीच्या वडिलांनी सांगितले...  

- अर्शीचे वडील मोहम्मद अरमान खान यांनी 'भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की त्यांच्या वडिलांचे 1945 साली निधन झाले होते. 
- जेव्हा त्यांचे निधन झाले त्यावेळी ते केवळ चार वर्षांचे होते. 
- अरमान यांनी पुढे सांगितले, "माझ्या बालपणीच वडिलांचे निधन झाल्याने मला स्वतःलाच त्यांच्या विषयीची फारशी माहिती नाही. तर त्यांनी 18 लग्ने केली आणि ते चारित्र्यहिन होते, हे अर्शीला कसे समजले."
- ते पुढे म्हणाले, "आम्ही कधीच त्यांच्याविषयी अर्शीला काहीही सांगितलेले नाही. मला फक्त माझ्या वडिलांविषयी एवढे ठाऊक आहे, की ते इंग्रजांच्या काळात भोपाळ सेंट्रल जेलमध्ये जेलर होते आणि त्यांनी दोनदा लग्न केले होते." 
- अर्शीची आई नादरा सुल्तानसुद्धा तिच्यावर संतापल्या असून कुटुंबीयांवर अशी चिखलफेक करणे अर्शीला शोभत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


पुढे बघा अर्शी खानचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...