आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उघड झाला BIGG BOSS कंटेस्टंट अर्शीचा खोटारडेपणा, स्वतः वडिलांनीच केली पोलखोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉस सीझन-11 ची स्पर्धक आणि मॉडेल अर्शी खान आपल्या फॅमिलीसोबत. - Divya Marathi
बिग बॉस सीझन-11 ची स्पर्धक आणि मॉडेल अर्शी खान आपल्या फॅमिलीसोबत.

भोपाळः बिग बॉस सीझन 11मध्ये सहभागी झालेली भोपाळची मॉडेल अर्शी खानने स्वतःच्या आजोबांना चारित्र्यहिन व्यक्ती असल्याचे सांगून नवीन वाद उभा केला आहे. आजोबा सुलेमान खान यांनी 18 लग्न केले होते आणि या लग्नांपासून त्यांना 12 मुले झाल्याचे अर्शीने बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये म्हटले होते. पण अर्शी खोटे बोलत असल्याचे स्वतः तिच्या वडिलांनी सांगितले आहे.
  
कुटुंबीयांनीच केली अर्शीची पोलखोल...
अर्शीचे वडील मोहम्मद अरमान खान यांनी 'भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की त्यांच्या वडिलांचे 1945 साली निधन झाले होते. त्यावेळी ते केवळ चार वर्षांचे होते. अरमान यांनी पुढे सांगितले, "माझ्या बालपणीच वडिलांचे निधन झाल्याने मला स्वतःलाच त्यांच्या विषयीची फारशी माहिती नाही. तर त्यांनी 18 लग्ने केली आणि ते चारित्र्यहिन होते, हे अर्शीला कसे समजले. आम्ही कधीच त्यांच्याविषयी अर्शीला काहीही सांगितलेले नाही. मला फक्त माझ्या वडिलांविषयी एवढे ठाऊक आहे, की ते इंग्रजांच्या काळात भोपाळ सेंट्रल जेलमध्ये जेलर होते आणि त्यांनी दोनदा लग्न केले होते." अर्शीची आई नादरा सुल्तानसुद्धा तिच्यावर संतापल्या असून कुटुंबीयांवर अशी चिखलफेक करणे अर्शीला शोभत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.


अफगानिस्तानमध्ये नव्हे, भोपाळच्या जहांगीराबादमध्ये आहे अर्शीचे घर...
- अर्शीने शोमध्ये सांगितले होते, ती मुळची अफगानिस्तानची आहे. पण प्रत्यक्षात ती भोपाळच्या जहांगीराबादची आहे. येथे तिचे आईवडील आणि चार भाऊ वास्तव्याला आहेत. हे घर तिच्या आजोबांनीच बनवले होते.

 

अफरीदीसोबत लग्न केल्याचा अर्शीने केला होता दावा...
- अर्शीने पाक क्रिकेटर शाहिद अफरीदीसोबत लग्न केल्याचा दावा केला होता. इतकेच नाही तर ती या लग्नापासून प्रेग्नेंट असल्याचेही तिने म्हटले होते. याप्रकरणी स्वतः शाहिदी अफरीदीला स्ष्टीकरण द्यावे लागले होते. हा केवळ अर्शीचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे अर्शीची आई नादरा सुल्तान यांनी म्हटले होते.


पुढील स्लाईड्समध्ये बघा PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...