आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिक्रेट सोसायटी नव्हे, आता \'बिग बॉस\' घेणार सर्व निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'च्या सेटवर सलमान खान, श्रध्दा कपूर आणि शाहिद कपूर)
मुंबई: 'संडे का वॉर'च्या एपिसोड अनेक उत्सूकतेच्या क्षणांचा साक्ष बनला. 'बिग बॉस 8'चा हा एपिसोड वादळापूर्वीची शांतता अशा स्वरुपाचा होता. सिक्रेट सोसायटीऐवजी आता सर्व निर्णयांना बिग बॉस आपल्या हातात घेणार आहे. दीपशिखा आणि आर जे प्रीतम यांनी पुनीत इस्सरला फ्लाइट BB08मध्ये जॉइन केले आहे. पुढे वाचा कसा होता 'बिग बॉस'चा सातवा दिवस...
सिक्रेट सोसायटी होणार सामान्य
सिक्रेट सोसायटीऐवजी आता सर्व निर्णय बिग बॉस घेणार आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिले, की पॅसेंजर्स सिक्रेट सोसायटीच्या आदेशांचे पालन करत होते. मात्र सिक्रेट सोसायटीचे हे आदेश बिग बॉसमधून येत होते. आता सिक्रेट सोसायटीचे खास सदस्य सामान्य पॅसेंजर्सप्रमाणे पुढेही शोचा भाग राहतील. प्रीतम आणि दीपशिखाला आता पुढील एपिसोड्समध्ये इतर सदस्यांप्रमाणे खेळावे लागणार आहे.
फ्लाइटमध्ये वाढला
सुरुवातीला सिक्रेट सोसायटीमधून पुनीत इस्सर फ्लाइटमध्ये आल्यानंतर पॅसेंजर्सच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. परंतु आता सिक्रेट सोसायटीचे इतर सदस्यसुध्दा फ्लाइटमध्ये जातील तेव्हा ही परिस्थिती आधिकच मनोरंजनात्मक होईल. सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांसाठीसुध्दा येणारी वेळ खूप कठिण होणार आहे. आतापर्यंत सिक्रेट सोसायटीचे सदस्य पॅसेंजर्सना कंट्रोल करत होते. परंतु आता सर्वांवर एकसारखाच प्रसंग येणार आहेत.
शाहिद आणि श्रध्दाने दिले सरप्राइज
'बिग बॉस'च्या घरात रविवारीचा (28 सप्टेंबर) एपिसोड सरप्राइजेसने भरलेला आहे. पॅसेंजर्ससाठी सिक्रेट सोसायटीच्या मेंबर्सच केवळ सरप्राइज नव्हते. शाहिद कपूर आणि श्रध्दा कपूरने शोमध्ये हजेरी लावून सर्वांना सरप्राइज दिले. फ्लाइटचे प्रवास केल्यानंतर शाहिद आणि श्रध्दा पॅसेंजर्ससोबत काही वेळ घालवला. सोबतच, दोघांनी स्पर्धकांना टास्कसुध्दा दिले.
शाहिद केला सलमानसोबत डान्स
'बिग बॉस'च्या घरात शाहिद कपूर-श्रध्दा कपूरने 'हैदर' सिनेमाच्या प्रमोशन निमित्त सलमान खाससोबत डान्स केला. तिघे 'हैदर'च्या बिस्मिल गाण्यावर थिरकताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा DAY 7ची इतर छायाचित्रे...