आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossच्या घरात कैद झाला 'नैतिक', इकडे पत्नीने असा सेलिब्रेट केला करवाचौथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती करण मेहरा, डिझायनर रोहित वर्मा आणि इतर काही फेंड्ससोबत निशा रावल. - Divya Marathi
पती करण मेहरा, डिझायनर रोहित वर्मा आणि इतर काही फेंड्ससोबत निशा रावल.
मुंबईः घराघरांत 'नैतिक' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता करण मेहरा आता बिग बॉसच्या दहाव्या पर्वात झळकत आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला करण पुढील तीन महिन्यांसाठी बिग बॉसच्या घरात कैद झाला आहे. साहजिकच त्याची पत्नी निशा रावल नक्कीच त्याला मिस करत असणारेय. आज (19 ऑक्टोबर) करवाचौथ आहे. करवाचौथच्या पुर्वसंध्येला निशाने तिच्या फ्रेंड्ससोबत एक छोटेखानी पार्टी एन्जॉय केली. मित्रांसाठी निशाने ठेवली पार्टी...
करवाचौथच्या निमित्ताने निशाने आपल्या खास मित्रांसाठी बुधवारी रात्री एक छोटी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत डिझायनर रोहित वर्मा, राखी सावंतसह तिचे काही खास फ्रेंड्स सहभागी झाले होते. मित्रांसोबत निशाने मेंदी फंक्शन एन्जॉय केला. या सेलिब्रेशनचे फोटोज निशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निशासुद्धा अभिनेत्री आहे. 'आने वाला कल', 'केसर' आणि 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' या मालिकांमध्ये निशाने काम केले आहे. 'रफू चक्कर' आणि 'जॅक अँड जिल' या सिनेमांमध्ये निशा झळकली आहे. 2012 मध्ये निशा आणि करण विवाहबद्ध झाले. 'नच बलिए सीझन 5' मध्ये ही जोडी झळकली होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, निशा रावलच्या प्री करवाचौथ पार्टीचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...