आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BB10@Day 2: या अभिनेत्याच्या प्रेमाच्या जाळ्यात तर अडकत नाहीये युवीची वहिनी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बिग बॉसच्या घरातील पहिला दिवशी स्पर्धकांचे नॉमिनेशन झाले. तर दुस-या दिवशी प्रेम आणि भांडणाची झलक बघायला मिळाली. युवराज सिंहची वहिनी आकांक्षा शर्मा आणि अभिनेता गौरव चोप्रा यांच्यात जवळीक निर्माण होताना दिसली. तर ओमजी महाराजांनी अशी काही वर्तणुक केली, की लोपमुद्रा राऊत हिने त्यांना वॉर्निंग दिली. एक नजर टाकुया, दुस-या दिवशी बिग बॉसच्या घरात घडलेल्या घडामोडींवर...
बिग बॉसच्या स्पर्धकांना शोचा पहिला लग्झरी बजेट टास्क "राज" देण्यात आला. यानुसार सेलिब्रिटींना काही रहस्य सांगण्यात येत आहेत, त्यावरुन ते रहस्य कुठल्या इंडियावालेचे आहे, ते त्यांना ओळखायचे होते. टास्कची घोषणा होताच स्वामी ओमजी महाराज थोडे घाबरलेले दिसले. ते वारंवार लोपमुद्रावर ती विश्वासघाती असल्याचा आरोप लावत होते. इतकेच नाही तर स्वामीजींनी तिला धमकी दिली, की तिने रहस्य उघगडू नये. त्यांना काळी जादू येत असल्याचेही त्यांनी म्हटले, मात्र घराच्या आत त्यांना काळी जादू करण्याची परवानगी नाही.

स्वामीजींनी प्रत्येक इंडियावाले टीममधील सदस्यांसोबत लोपमुद्राविषयी चर्चा केली. लोपाला ही स्वामीजींची ही गोष्ट चांगलीच खटकली. ती त्यांच्यावर चांगलीच भडकली आणि तिच्याविषयी कुणासोबतही चर्चा न करण्याची ताकिदच त्यांना दिली. लोपाने बिग बॉसकडेसुद्धा स्वामीजींची तक्रार केली. नंतर बिग बॉसने त्यांना कन्फेशन रुममध्ये बोलावून नॅशनल टीव्हीवर त्यांनी असे वर्तन करु नये, अशी ताकिद दिली. अखेर ओमजी महाराजांनी सर्व स्पर्धकांची विशेषतः लोपमुद्राची कान पकडून माफी मागितली.

आकांक्षा आणि गौरव यांच्यात वाढतेय जवळीक...
बिग बॉसने सर्व सेलिब्रिटीजना पहिले रहस्य सांगितले.
'मम्मी की दोस्ती भारी पड़ी ऐसी
शादी करके हो गई जिंदगी की ऐसी-तैसी
मैं हूं...

यावरुन सेलिब्रिटींना हे रहस्य कुठल्या इंडियावालेचे आहे, ते ओळखायचे आहे. दुस-या दिवशी घरात आकांक्षा आणि गौरव यांच्यात जवळीक वाढताना दिसली. आकांक्षाने गौरवला सांगितले, की जोरावर (युवराज सिंगचा भाऊ) आई आणि तिची आई चांगल्या मैत्रिणी आहेत. याच कारणामुळे जोरावरसोबत तिचे लग्न झाले होते. बोलण्याबोलण्यात गौरवने आकांक्षाच्या डोळ्यांचे कौतुक केले. तर आकांक्षासुद्धा गौरवच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक दिसली.

ओमजींनी केले आकांक्षावर कमेंट, तर गौरवचे भरले कान
सेलिब्रिटीजनी लग्झरी बजेट टास्क यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांनी हे रहस्य आकांक्षाच्या आयुष्याशी निगडीत असल्याचे बिग बॉसला सांगितले. यावेळी ओमजी महाराजांनी आकांक्षाविषयी वक्तव्य करताना म्हटले, की तिला गुलामगिरीत राहण्याची सवय असून बिग बॉसच्या घरातसुद्धा ती यासाठीच आली आहे. ओमजीने गौरव आणि आकांक्षा यांच्यात सुरु असलेल्या गप्पा बघून हे कमेंट केले. हे वक्तव्य ऐकून आकांक्षा चांगलीच भडकली आणि तिने स्वामीजींना चांगलेच खडे बोल सुनावले.

त्यानंतर ओमजी गौरवचे आकांक्षाच्या विरोधात कान भरताना दिसले. गौरवला त्यांनी म्हटले, की आकांक्षा आता त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असून त्याच्याशी लग्नाचा विचार करतेय. मात्र जी आपल्या नव-याची होऊ शकली नाही, ती तुझी काय होणार, असे ओमजी गौरवला म्हणताना दिसले. गौरवने ओमजींना स्पष्ट शब्दांत सांगितले, की आकांक्षाकडून त्याला असे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत.

किचन, सेलिब्रिटीज आणि खटपट
बिग बॉसच्या घरात सध्या इंडियावाले मालक आणि सेलिब्रिटीज त्यांचे सेवक आहेत. खास गोष्ट म्हणजे इंडियावाले टीमला सेलिब्रिटींच्या हातचे जेवण पसंत पडत नाहीये. मनोज पंजाबी आणि इतर इंडियावाले याविषयी डिस्कस करताना दिसले. शिवाय वीजे बाणी आणि प्रियांका जग्गा यांची कॅटफाइट बिग बॉसच्या घरात उघडपणे पाहायला मिळाली. प्रियांकाने बाणीला एक काम सांगितले होते. मात्र बाणीच्या मते, तिला एखादे काम सांगताना समोरच्याने प्लीज हा शब्द वापरायला हवा. मात्र प्रियांका तिला प्लीज म्हणण्यास तयार नव्हती. सेवकांना प्लीज का म्हणावे, असे प्रियांकाचे म्हणणे होते. नंतर प्रियांका करण मेहरा आणि इतर काही स्पर्धकांसमोर रडताना दिसली.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, दुस-या दिवसाची झलक फोटोजमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...