आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस Day 5: प्रियांकाने पँटात केली शौच, नंतर वीजे बाणीकडून धुवून घेतले तेच घाण कपडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका जग्गा आणि  वीजे बाणी - Divya Marathi
प्रियंका जग्गा आणि वीजे बाणी
मुंबईः इंडियावाली प्रियांका जग्गाने घराचे मालक असल्याची संधी हातून दवडू दिली नाही. पाचव्या दिवशी टास्कवेळी पँटमध्ये प्रियांकाने शौच केली होती. नंतर तेच घाण कपडे धुण्याचा आदेश तिने वीजे बाणीला दिला. रंजक बाब म्हणजे बाणीने प्रियांकाचा आदेश मानत ते कपडे धुतले. मात्र यापूर्वी दोघींमध्ये चांगला वादविवादाचा खेळ रंगला. काय होता टास्क...

इंडियावाले टीममधील सदस्यांनी स्वतः स्वयंपाक करुन घरातील एक महत्त्वाचा नियम मोडित काढला. या कारणामुळे बिग बॉसने सेलिब्रिटीज आणि त्यांना एक टास्क दिला. त्यानुसार दोन्ही टीममधी दोनदोन स्पर्धकांमध्ये खेळ रंगणार होता. सेलिब्रिटीज टीममधून गौरव चोप्रा आणि वीजे बाणी तर इंडियावाले टीममधून प्रियांका जग्गा आणि नवीन प्रकाश या खेळात सहभागी झाले.
या टास्कअंतर्गत चारही स्पर्धकांना गार्डन परिसरात लावण्यात आलेल्या कृत्रिम घोड्यांवर स्वार होऊन तो सतत चालवायचा होता. तर इतर सदस्यांना त्यांच्या विरोधातील टीममधील स्पर्धकांना पाणी पाजून घोड्यावरुन खाली उतरवण्याचा प्रयत्न करायचा होता. सर्वाधिक काळ घोड्यावर स्वार राहणा-या खेळाडूला टास्कचा विनर घोषित करण्यात येणार होते. आणि प्राइज म्हणून त्या स्पर्धकाची टीम घराचे मालक होणार होते. या टास्कदरम्यान प्रियांका स्वतःवर ताबा ठेऊ शकली नाही आणि तिने पँटमध्येच शौच केली. असे होऊनसुद्धा ती शेवटपर्यंत टास्कमध्ये टिकून राहिली आणि टास्कची विजेती ठरली.
तुरुंगात एकटी आहे मोनालिसा
प्रियांकाने टास्क जिंकल्यानंतर बिग बॉसने तिला एक स्पेशल पॉवर दिला. त्याचा वापर करत तिने स्वामी ओमजी महाराजांना तुरुंगातून बाहेर काढले. मोनालिसा तुरुंगात एकटी पडल्याने तिला यावेळी रडू आवरले नाही.

प्रियांकाच्या निशाण्यावर आला रोहन
रोहन मेहरा पुन्हा एकदा प्रियांकाच्या निशाण्यावर आला. झाले असे की, आकांक्षा शर्मा टास्कदरम्यान प्रियांकाचे केस सावरत होती. रोहनने यावर आक्षेप नोंदवत स्पर्धकाला टच करु नको, अशी ताकिद त्याने आकांक्षा दिली. यावर भडकलेल्या प्रियांका त्याच्यावर ओरडून म्हणाली, "पहले चूजा तो बन जा।"

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पाचव्या दिवसाची झलक छायाचित्रांमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...