आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 10: प्रियांका जग्गा झाली बेघर, इंडियावाले टीमच्या हातून गेली सत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बिग बॉस 10 या वादग्रस्त रिअॅलिटी शोचे पहिले एलिमिनेशन झाले आहे. या पर्वात भांडणांमुळे प्रसिद्धीस आलेली प्रियांका जग्गा पहिल्या एलिमिनेशन राउंडमध्येच बाहेर पडली. पहिल्या एलिमिनेशन राउंडमध्ये शेवटी चार स्पर्धक राहिले होते. यांमध्ये गौरव चोप्रा, मन्नू पंजाबी, मोनालीसा आणि प्रियांका जग्गा यांचा समावेश होता. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे प्रियांका जग्गा शोमधून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यात आले. सलमान म्हणाला, कठीण आहे हे सीझन....

सहाव्या दिवशी सलमान खानने स्पर्धकांना हे सीझन कठीण असल्याचे सांगितले. प्रियांकाच्या एलिमिनेशननंतर सलमानने तिच्याशी संवाद साधला. तू कुठे कमी पडलीस असा प्रश्न सलमानने तिला केला. त्यावर प्रियांका म्हणाली की, मलाचं माहित नाही मी कुठे कमी पडले. माझ्या मते मी चांगल्या पद्धतीने खेळत होते. बहुदा कुठेतरी मी जास्तच चर्चेत राहिले असावी. गेल्या आठवड्यात प्रियांका बरीच चर्चेत राहिली होती. गेल्या आठवड्यात बिग बॉसने दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने कपड्यांमध्येच टॉयलेट केल्याने, ती अधिकच चर्चेत आली. बहुदा तिचे जास्त चर्चेत राहणेच प्रेक्षकांना रुचले नसावे.
स्वामीजी होते सगळ्यांच्या निशाण्यावर...
दरम्यान, याआधी शनिवारी सलमान खानने घरातील सर्व सदस्यांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्न केले. मात्र, यावेळी स्वामीजी सर्वांच्या निशाण्यावर होते. सर्व सदस्यांनी स्वामीजींबाबत सांगण्यास सुरुवात केली. यावरून पहिल्याच आठवड्यात सर्वजण स्वामीजींना किती कंटाळले आहेत ते कळते. त्यांच्याविषयी बोलताना रोहन म्हणाला की, स्वामीजी या घराचेच नाही तर पूर्ण देशाचे खलनायक आहेत. तर लोपामुद्रा म्हणाली की, मला स्वामीजींची भीती वाटते.

इंडियावेल टीमच्या हातून निसटली सत्ता...
रिपोर्ट्सनुसार, सेलिब्रिटीज लवकरच घराचे मालक बनू शकतात. नॉमिनेशन प्रक्रियेदरम्यान योजना आखून सेवकांनी घराचे नियम तोडलेत. त्यामुळे नाराज झालेल्या बिग बॉसने आता सेलिब्रिटीज घराचे मालक आणि इंडियावाले सेवक असल्याची घोषणा केली आहे.
कोण आहे प्रियांका जग्गा...
32 वर्षीय प्रियांका जग्गा एक सर्वसामान्य सदस्य म्हणून बिग बॉसच्या घरात आली होती. प्रियांका दिल्लीमध्ये मार्केटिंग रिक्रूटर आहे. ती बोल्ड आणि सुंदर तर आहेच शिवाय ती एक आईही आहे. प्रियांका जग्गा मुइस या नावाने तिला अनेकजण ओळखतात. प्रियांकाचा जन्म 17 डिसेंबर 1984 मध्ये झाला. ती इतरांपेक्षा थोडी जास्तच फॅशनेबल आहे. ‘मी एक मॉर्डन आई आहे. मी रुढीवादी नक्कीच नाही, त्यामुळे नियम तोडताना मला काहीच वाटत नाही. अनेकदा लोक मला आणि माझ्या फॅशनकडे सारखे बघत असतात. पण मला काहीच फरक पडत नाही. लोकं माझ्याबाबतीत काय विचार करतात याचा विचार मी अजिबात करत नाही.’, असे तिचे म्हणणे होते.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, सहाव्या दिवसाची झलक फोटोजमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...