आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे मनवीर गुर्जरच्‍या लग्‍नाचे सत्‍य, या कारणामूळे वडिलांनी धरला होता अबोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनवीर गुर्जर आणि त्‍याची पत्‍नी - Divya Marathi
मनवीर गुर्जर आणि त्‍याची पत्‍नी
नोएडा- 'बिग बॉस 10' सिझनचा विजेता मनवीर गुर्जर आपल्‍या विवाहामुळे पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. मनवीरने आपल्‍या विवाहाबाबतीत अद्याप मौन बाळगले असले  तरी त्‍याचे कुटुंबिय आणि नातेवाईकांकडून रोज नवनवीन खुलासे करण्‍यात येत आहे. इंडियन एक्‍सप्रेसच्‍या रिपोर्टनूसार, मनवीरच्‍या काही नातेवाईकांनी हे मान्‍य केले आहे की, त्‍याचा विवाह झालेला आहे. विशेष म्‍हणजे नातेवार्इकांनी हे देखील मान्‍य केले की, विवाहानंतर मनवीरने आपल्‍या पत्‍नीला सोडून दिले. 
 
काय याच कारणामूळे मनवीरचे वडील त्‍याच्‍याशी बोलत नव्‍हते? 
- 'बिग बॉस 10'च्‍या एका एपिसोडमध्‍ये मनवीरचे वडील त्‍याला भेटण्‍यासाठी आले होते. तेव्‍हा ही गोष्‍ट समोर आली होती की, मनवीरचे वडील त्‍याच्‍याशी 8 वर्षांपासून बोलत नाहीए. 
- अशात बिग बॉसच्‍या घरात दोघांचे भेटणे हा एक भावनिक क्षण होता. मात्र त्‍यावेळी त्‍यांच्‍यामधील अबोल्‍याचे कारण समोर आले नव्‍हते. 
- आता मनवीरच्‍या नातेवाईकांनी सांगितले आहे की, मनवीरने विवाहानंतर आपल्‍या पत्‍नीला सोडून दिल्‍यामूळे  वडील त्‍याच्‍यावर नाराज होते. म्‍हणूनच त्‍याच्‍याशी ते बोलत नव्‍हते. 
- मनवीरचा भाऊ सचिन बायसौयाने सांगितले आहे की, 'मनवीर लवकरच या सर्व मुद्यांवर आपले म्‍हणणे मांडणार आहे.' 
 
पुढील स्‍लाईडवर वाचा, मनवीरच्‍या विवाहाच्‍या वृत्‍तामूळे नितिभा कौलला बसला धक्‍का...     
   
 
 
बातम्या आणखी आहेत...