आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO शेअर करुन करण पटेलने केली हिना खानची पोलखोल, म्हणाला - \'भोली सूरत गंदी नियत\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ये हैं मोहब्बतें' मधील रमण भल्ला (करण पटेल) ने आपल्या ट्विटर हँडलवर हिना खानला फटकारले आहे. काही प्रेक्षकांनादेखील शिल्पा शिंदे आणि अर्शी खान यांच्यासोबत हिनाने केलेले वर्तन आवडले नाही. करणने ट्विट केले...  'ती मॅडम जी बिग बॉस 11 च्या घरात आहे, जी प्रत्येक गोष्टीत थँक्यू गॉड म्हणत असते. ती कशी वागते आहे. तिला कोणीतरी विचारा की, ती इतका घाणेरडा खेळ का खेळते आहे? कितना गंदा खेलोगी मॅडम भोली सूरत गंदी नियत। #Sick#Sadistic #Disgrace .. #BholiSuratGandiNeeyat ..! #FakeToTheSoul . 


यानंतर करणने दोन व्हिडिओदेखील शेअर केले आहेत. यात हिना खान खोटं बोलताना दिसत आहे. खरं तर, हिना, लव्ह आणि प्रियंक अर्शीच्या लाँजरीविषयी बोलत होते. मात्र जेव्हा कोर्टरूममध्ये हिना याविषयी विचारण्यात आले. तेव्हा तिने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली की, आम्ही असे काहीही बोलत नव्हतो.' 


करणच्या ट्विटनंतर हिनाच्या चाहत्यांनी करणलाही झाडले. त्याचे उत्तर देत करणने लिहिले... 

माझ्याट्विटमुळे कोणाच्या चाहत्यांना राग आला तर मला काही समस्या नाही. मी त्यांच्या फेवरेट्सविषयी त्यांच्या लॉयल्टीचा आदर करतो. तरीदेखील मी माझे म्हणणे मांडणारच. 

 

करणने शेवटी सांगितले की, त्याला हितेन आणि विकास आवडतात.' तो म्हणाला, 'या दोघांपैकी एकाने या सीझनमध्ये बाजी मारावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, करणने शेअर केलेले व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...