आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त, शिल्पा शिंदे बरळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ‘बिग बॉस’च्या घरात दररोज नवनवीन वाद विवाद बघायला मिळतात. आता तर ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
“मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतात. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मै नही करुंगा…… असं त्यांचं वागणं असतं… मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है”, असं शिल्पा शिंदे म्हणाली. बिग बॉसच्या घरात विकास गुप्तासोबत मराठी कलाकारांविषयी बोलत असताना शिल्पानं हे वक्तव्य केलं. 


एकीकडे शिल्पाने मराठी कलाकारांच्या वर्मावर बोट ठेवलं असलं, तरी तिने उत्तम कलाकारांचं तोंडभरुन कौतुकही केलं. विक्रम गोखले, मोहन गोखले, स्मिता जयकर यांचं तिने कौतुक केलं. शिल्पा म्हणाली, “विक्रम गोखले यांनी नटसम्राट सिनेमात केलेलं काम पाहताना मला अश्रू अनावर होत होते. ते अभिनय करत आहेत हे माहित असूनही आम्हाला रडू येत होतं, यावरुन ते किती महान कलाकार आहेत याची प्रचिती येते”


स्मिता जयकर या खूपच संवेदनशील अभिनेत्री आहेत, तर मोहन गोखले यांनी जो अभिनय केला, ते ते त्यांच्या आयुष्यात घडत गेलं, असं शिल्पा शिंदे म्हणाली. 


आता मराठी कलाकार मंडळी शिल्पाच्या या टीकेवर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...