आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस'मध्ये पर्सनल कमेंट, हिना म्हणाली- अर्शीने तिला म्हटले होते Mistress

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस-11'मध्ये अर्शी खान आणि हिना खान यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. शोमध्ये लक्झरी बजट टास्कमध्ये विकास गुप्ता आणि हिना खान वकिलाच्या भूमिकेत होते. त्यांनी कोर्टरुम ड्रामा केला. यावेळी हिनाने सांगितले, की अर्शीने तिला सुरुवातीला कंटेस्टंट जुबेर खानची Mistress म्हटले होते. त्यावर अर्शी म्हणाली की जुबेर तिच्या आईबद्दल काहीही बोलला होता तेव्हा तिने कोणतीही अॅक्शन घेतली नव्हती. यावरुनच हिना आणि अर्शीमध्ये भांडणाला सुरुवात झाली. 

 

हिना-अर्शीमध्ये खडाजंगी 
- शोमध्ये अर्शी खान आणि हिना खान यांच्यात जोरदार भांडण झाले. 
- अर्शी म्हणाली की हिना सब्यासची सतपतीसोबत घाणेरडे बोलत असते. 
- त्यानंतर अर्शी म्हणाली की त्यांनी कदाचित ऐकण्यात काही चूक केली असेल. 
- एवेढ्यावरच हा वाद थांबला नाही तर, पुनीष शर्माने आगीत तेल ओतण्याचे काम केले. तो अर्शीला म्हणाला की, हिना म्हणत होती की बाहेर गेल्यानंतर पहिले 'ती' सेक्स रॅकेटची क्लिप पाहाणार आहे. 
- हे ऐकल्यानंतर अर्शी भडकली आणि म्हणाली हिनाला आता पाहातेच. 

प्रियंकला बुटाने मारण्याची धमकी 
- हिनानंतर अर्शीचे भांडण प्रियंकसोबत सुरु झाले होते. 
- या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी विकास गुप्ताला अर्शीला उचलून घेऊन शांत करावे लागले. 
- अर्शी म्हणाली, की प्रियंक जर घरात तिच्याबाबत काही वाईट बोलला तर त्याला बुटानेच मारेल. 

 

सकाळीच हिनाला कोसळले रडू 
- एपिसोडमध्ये हिना-शिल्पा यांच्यातही ब्रेकफास्टवरून भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. 
- ब्रेकफास्ट तयार करण्याची जबाबदारी शिल्पाची होती, मात्र तिने हिनासाठी काही केले नाही. 
- जवळपास एक तास होऊनही हिनाला ब्रेकफास्ट मिळाला नाही तेव्हा तिला रडायला आले. ती म्हणाली की या भांडणात जेवणाला आणू नका. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, BIGG BOSS-11 एपिसोडचे Photos..

बातम्या आणखी आहेत...