आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरचं आफ्रिदीच्या मुलाची आई होणार होती का अर्शी? बिग बॉसमध्ये केला खुलसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्त मॉडेल अर्शी खान हिने सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस-11 मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा उल्लेख केला. शोमध्ये एक टास्क होता, त्यामध्ये प्रत्येक कंटेस्टंटला एकट्यात कॅमेरासमोर जाऊन स्वतःबद्दलचे एक डर्टी सिक्रेट रिव्हिल करायचे होते. त्यात अर्शी खानने सुरुवातीपासून तिच्यासोबत जोडले गेलेले नाव, म्हणजे शाहिद आफ्रिदीबद्दलचा खुलासा केला. 
 
आफ्रिदीच्या मुलाची आई होण्याची बातमी फेक 
- 2015-16 मध्ये अर्शी खानने शाहिद आफ्रिदीच्या मुलाची मी आई होणार असल्याचे सांगत खूप प्रसिद्धी मिळवली होती. रविवारी झालेल्या वीकेंड वॉर एपिसोडमध्ये तिने या बातम्या फेक होत्या, ती फक्त एक थट्टा होती, असे म्हटले आहे. 
- अर्शी म्हणाली, आधी माझे नाव शाहिद सोबत जोडले गेले होते. त्या काळात एका मीडिया पर्सनने मला विचारले की, तुम्ही शाहिदच्या बाळाची आई होणार आहे का? त्याला होय, उत्तर देताना मी म्हटले, असे होऊ शकतो. 
- अर्शीचे हेच वक्तव्य खूप व्हायरल झाले  होते आणि अनेकांनी त्याला ती शाहिद आफ्रिदीच्या बाळाची आई होणार असल्याचे सांगत प्रसिद्धी दिली होती. 
- आता बिग बॉसमध्ये तिने स्वतः कबूल केले आहे की तो फक्त एक विनोद होता, थट्टा होती. 
- याच काळात टी-20 वर्ल्डकप दरम्यान जेव्हा भारत-पाकिस्तान सामना होता तेव्हा अर्शीने म्हटले होते, की आफ्रिदीने जर भारताविरोधात शतक ठोकले तर फ्रंट एक्सपोज करेल, मात्र तिचे हे स्वप्न आफ्रिदीने पूर्ण होऊ दिले नाही. भारताने सामना जिंकला तेव्हा तिने बॅक एक्सपोज करत चर्चात राहाण्याची किमया साधली होती. 
बातम्या आणखी आहेत...