आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरिड आहे बिग बॉसची ही कंटेस्टंट ! आता घटस्फोटीत व्यक्तीसोबत करत आहे डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुनीष शर्मा आणि बंदगी कालरा यांच्यात कशी जवळीक वाढली हे वरच्या फोटोवरुन दिसते तर खालच्या फोटोत डेनिस नागपालसोबत बंदगी. - Divya Marathi
पुनीष शर्मा आणि बंदगी कालरा यांच्यात कशी जवळीक वाढली हे वरच्या फोटोवरुन दिसते तर खालच्या फोटोत डेनिस नागपालसोबत बंदगी.
मुंबई - रियालिटी शो बिग बॉस-11 मधील बंदगी कालरा कंटेस्टंट पुनीष शर्मासोबतच्या जवळीकीने चर्चेत आहे. मात्र, अशी माहिती आहे, की बंदगी रियल लाइफमध्ये बिग बॉसचा कास्टिंग आणि को-डायरेक्टर डेनिस नागपाल याला डेट करत आहे. त्यानंतरही कॅमेरासमोर ती वारंवार पुनीषच्या जवळ जाताना दिसत आहे. दरम्यान, आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे, ती अशी की बंदगी विवाहित आहे.
 
दिल्लीतील बिझनेसमॅनसोबत बंदगीचे झाले आहे लग्न 
- अर्शी खान, प्रियंक शर्मा, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्या पर्सनल लाइफ बद्दल खुलासे करणारी अॅक्ट्रेस गहना वशिष्ठने नुकताच बंदगी कालरावर निशाणा साधला आहे. 
- गहनाने तिच्या ताज्या मुलाखतीत बंदगी कालराबद्दल खुलासा केला आहे. गहना म्हणाली, 'बंदगीचे दिल्लीत राहाणाऱ्या पंजाबी बिझनेसमॅनसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या 2-3 वर्षानंतर ती पतीपासून वेगळी झाली. मात्र त्यांच्यात घटस्फोट झालेला नाही. फक्त ते दोघे आता सोबत राहात नाही.'
- 'बंदगीने तिच्या मॅरिड लाइफबद्दल कुठेही खुलासा केलेला नाही, बिग बॉसमध्येही तिने हे लपवून ठेवेल आहे.' 
 
आता घटस्फोटीतला करत आहे डेट 
- बिग बॉस कंटेस्टंट पुनीष शर्मा हा दिल्लीतील कंस्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे. त्याचे लग्न झाले असून तो घटस्फोटीत आहे. 
- तो पार्टी गाय असून त्याचा जास्तीत जास्त पैसा पब आणि बारमध्येच खर्च होतो. सध्या पुनीष आणि बंदगीच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. 
- रिच फॅमिलीतील पुनीषने वडिलांचे कोट्यवधी रुपये हे पार्टी आणि दारूमध्ये उडवलेले आहेत. 
 
कोण आहे बंदगी 
- दिल्लीची राहाणारी बंदगी कालरा हिने बीटेक केले असून, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ती सीनियर इंजिनिअर आहे. 
- 25 वर्षांची बंदगी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. दररोज आपले हॉट फोटो सोशल मीडियाव अपलोड करण्याचा तिला छंद आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बंदगी कालराचे पुनिष आणि डेनिस नागपालसोबतचे फोटो. 
बातम्या आणखी आहेत...