Home »TV Guide» Bigg Boss 11: Contestant Bandgi Kalra Dating Bigg Boss Co-Director Dennis Nagpal

Bigg Boss 11: इंजिनिअर आहे ही स्पर्धक, 'बिग बॉस'चा को-डायरेक्टर आहे बॉयफ्रेंड!

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 11:48 AM IST

मुंबईः 'बिग बॉस-11' मध्ये कॉमनर्स कंटेस्टंट म्हणून सहभागी झालेली बंदगी कालरा या शोमध्ये फारशी लाइमलाइटमध्ये नाहीये. गेल्या एपिसोडमध्ये तिचे जुबेर खानसोबत चांगलाच वाद झाला होता. एवढा एक वाद सोडला तर बंदगी बिग बॉसच्या घरात शांतच राहते. पण ती सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे मात्र नक्कीच चर्चेत आली आहे.

'बिग बॉस'चा को-डायरेक्टर आहे बंदगीचा बॉयफ्रेंड...
- 'बिग बॉस'च्या सहदिग्दर्शकासोबत बंदगीचे खास कनेक्शन आहे. एका लीडिंग वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, बंदगी 'बिग बॉस'चा कास्टिंग आणि को-डायरेक्टर डेनिस नागपाल (Dennis Nagpal) ला डेट करत आहे.
- डेनिस को-डायरेक्टरसोबतच निर्माता आणि 'बिग बॉस'च्या क्रिएटिव्ह टीममध्ये महत्त्वाची भूमिका साकारतोय. अनेक इव्हेंट्समध्ये बंदगी डेनिससोबत दिसली आहे.
- अलीकडेच डेनिसने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्वीट करुन प्रेक्षकांना बंदगीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते. "Guys please log in to *Voot* and vote for Bandgi Kalra to save her from getting eliminated"।
- शिल्पा शिंदे, ज्योती कुमारी, जुबैर खान आणि अर्शी खानसोबत बंदगीला पहिल्या एविक्शनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते.

बंदगीच्या बॉयफ्रेंडचा जवळचा मित्र आहे पुनीश
- बिग बॉसच्या फ्रायडे का फैसलामध्ये बंदगी तिचा सह-स्पर्धक पुनीश शर्मासोबत जवळीक वाढवताना दिसली होती.
- बंदगी आणि पुनीश शोमध्ये एक प्लान आखताना दिसले होते. त्यांच्या या प्लाननुसार ते शोमधील इतर स्पर्धकांसमोर लव्ह बर्ड्ससारखे वागताना दिसणार आहेत.
- विशेष म्हणजे, खासगी आयुष्यात पुनीश, बंदगीचा बॉयफ्रेंड डेनिसचा जवळचा मित्र आहे.

सॉफ्टवेअर कंपनीत सीनिअर इंजिनिअर आहे बंदगी...
- बंदगी कॅपेजेमिनी इंडिया या सॉफ्टवेअर कंपनीत सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. तिने बीटेकची पदवी प्राप्त केली आहे.
- 25 वर्षीय बंदगी सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. ती नित्यनेमाने स्वतःचे हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. बॉयफ्रेंडसोबतचेही अनेक फोटोज तिने शेअर केले आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा. बॉयफ्रेंड डेनिस नागपालसोबतचे बंदगी कालराचे निवडक PHOTOS...

Next Article

Recommended