आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस: वाइल्ड कार्ड एंट्रीने येऊ शकते ही अॅक्ट्रेस, जिंकला होता \'मिस आशिया बिकनी\' किताब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस-11 मध्ये या आठवड्यात पुनीश शर्मा, बंदगी कालरा आणि लव त्यागी एविक्शनसाठी नॉमिनेट झाले आहेत. दरम्यान अशी माहिती आहे की अर्शी खान आणि प्रियंक शर्मा बद्दल वेळोवेळी खुलासे करणारी गहना वशिष्ट शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे प्रवेश करण्याची शक्यता आहे. वास्तविक याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 


इंजिनिअरिंगसोडून झाली मॉडेल 
- छत्तीसगडमधील चिरिमिरी येथे जन्मलेली गहना हिचे सुरुवातीचे शिक्षण चिरिमिरी येथे झाले त्यानंतर ती भोपाळला आली. 
- भोपाळमध्ये ऑल सेंट कॉलेजमध्ये तिने रोबोटिक्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. 
- गहनाची आई डॉक्टर आणि वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यासोबत तिच्या कुटुंबात एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. तिची आजी शाळेची प्राचार्य होती. 

 

मिस आशिया बिकिनी होती गहना 
- गहनाचे खरे नाव वंदना आहे. मात्र झगमगत्या दुनियेत प्रवेश करायचे नक्की केल्यानंतर तिने स्वतःचे नाव गहना करुन घेतले. तिने इंजिनिअरिंग केल्यानंतर एका टीव्ही चॅनलसाठी अँकरिंग आणि काही टीव्ही सीरियल्समध्ये काम केले. 
- 2012 मध्ये गहनाने मिस आशिया बिकिनी किताब जिंकला आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली. 

- टीव्ही सीरियल्ससोबत गहनाने साऊथच्या फिल्ममध्ये काम केले आहे. तिच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप झाला होता. 
- गहना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. 2012 मध्ये तिने चॅलेंज केले होते की इंडियाने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडेल जिंकले तर न्यूड होऊन मीडियासमोर येणार. आणि जर सिल्व्हर मेडल जिंकले तर स्ट्रिपिंग करणार. 


अर्शीवर केले होते हे आरोप 
- गहना आणि अर्शी खान या दोघी भोपाळमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. त्यामुळे दोघींनाही एकमेकिंबद्दल सर्वकाही माहित आहे. 
- अर्शी खानची बिग बॉसमध्ये एंट्री झाल्यानंतर तिने बिग बॉसमध्ये सांगितलेले वय आणि ती अनमॅरिड असल्याचे खोटे सांगितल्याचे गहना म्हणाली होती. 
- गहनाने म्हटल्यानुसार अर्शीचे 50 वर्षांच्या एका व्यक्तीसोबत लग्न झालेले आहे. 
- गहनाच्या म्हणण्यानुसार अर्शीचे वय 32 पेक्षा जास्त आहे. मात्र ती सर्वांना 27 वर्षाची असल्याचे सांगते. अर्शीविरोधात 10 क्रिमिनल केसेस सुरु असल्याचाही खुलासा गहनाने केला होता. त्यातील 4 केसेस भारतात तर पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान केल्याचीही तिच्यावर केस आहे. तिने न्यूड होत स्वतःच्या बॉडीवर फ्लॅग पेंट केला होता. 
 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मिस आशिया बिकिनी विजेती गहनाचे फोटो.. 

बातम्या आणखी आहेत...