आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss च्या कॅप्टनसीवरून विकासला हटवणार, दुसरीकडे पुन्हा नॉमिनेट झाली 'अक्षरा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-11' मध्ये तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच शेजारी कंटेस्टंट लुसेंडा निकोलस अचानक झालेल्या नॉमिनेशनमधून एव्हीक्ट झाली. त्यानंतर घरातील इतर कंटेस्टंटमध्ये नॉमिनेशची प्रक्रिया राबवण्यात आली. कॅप्टन विकास गुप्ता या प्रक्रियेमधून सेफ होता. त्यात घरातील सदस्यांनी हिना खान, सपना चौधरी, आकाश ददलानी, पुनीष शर्मा आणि लव्ह त्यागीला नॉमिनेट केले. 

हात उचलल्याने कॅप्टनसी गमावणार विकास.. 
- पहिल्या आठवड्यात विकास गुप्ताच्या भांडणात प्रियांक शर्माने आकाश ददलानीवर गात उचलला आणि त्याला नॉमिनेशनशिवाय घराबाहेर काढण्यात आले. 
- लवकरच विकास आणि पुनीष यांच्यात जोरदार भांडण होणार असून रागात विकास त्यात हात उचलणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
- या कारणामुळे त्याला कॅप्टनसी तर गमवावीच लागणार आहे, पण त्याचबरोबर त्याला जेलमध्येही जावे लागणार आहे. 
- विकास जेलमध्ये गेल्यानंतर पुनीशला घरचा नवा कॅप्टन बनवले जाणार आहे. 

लव्ह त्यागी आणि अर्शी खानमध्ये झाला वाद 
- तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये अर्शी खान आणि लव्ह त्याही यांच्यात भांडण पाहायला मिळाले. 
- अचानक होत असलेल्या वोटींग एव्हीक्शनच्या वेळी अर्शीने लव्हला वोट देणार असे सांगितले होते. पण ऐनवेशी अर्शी बदलली आणि तिने लुसेंडाला तिचे मत दिले. 
- अर्शीच्या अशा वागण्यामुळे लव्हला वाईट वाटले आणि संतापल्याने त्याने अर्शीला ही दुश्मनी महागात पडेल अशी धमकी देऊन टाकली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'बिग बॉस'च्या या एपिसोडचे काही निवडक PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...