आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 11: केवळ 11 महिनेच टिकले होते या अॅक्टरचे पहिले लग्न, गौरीसोबत थाटला दुसरा संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 'क्योंकी की सास भी कभी बहू थी' (2003-06) मध्ये करण विरानी आणि 'पवित्र रिश्ता' (2011-14) या मालिकेत मानव देशमुखची भूमिका साकारणारा अभिनेता हितेन तेजवानीची बिग बॉसच्या 11 व्या पर्वात एन्ट्री झाली आहे. 'डर सबको लगता है'  (2016) या मालिकेत तो शेवटचा दिसला होता. हितेनच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला ठाऊक नसावे. हितेनचे दोनदा लग्न झाले आहे. खास गोष्ट म्हणजे त्याचे पहिले लग्न केवळ 11 महिनेच टिकले होते. स्वतः हितेनने 2015 साली एका मुलाखतीत याचा उलगडा केला होता. 

का मोडले होते हितेनचे पहिले लग्न...
- हितेनने कधीच त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव मीडियासमोर उघड केले नाही. पण रिपोर्ट्सनुसार, 2001 साली त्याचा घटस्फोट झाला होता. 
- हितेनने मुलाखतीत कबुली दिली होती, की या घटस्फोटाला त्याची पत्नी नव्हे तर तो स्वतः जबाबदार आहे. त्याने सांगितले होते, की कम्युनिकेशन गॅपमुळे त्यांच्यातील अंतर एवढे वाढले, की ते दोघे विभक्त झाले. 
- हितेनने सांगितले होते, "माझे पहिले लग्न झाले, तेव्हा माझ्या करिअरची फक्त सुरुवात झाली होती. त्यामुळे मी पत्नीला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अरेंज मॅरेजमध्ये प्रेम हे लग्नानंतर जुळते. पण माझ्या बाबतीत असे होऊ शकले नाही. त्यामुळे केवळ 11 महिन्यांतच आम्ही आमचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता."
 
पुढे वाचा, हितेनच्या घटस्फोटामुळे नाराज होते त्याचे पालक, गौरीने दिला होता सुरुवातीला लग्नाला नकार... यासह बरंच काही...
बातम्या आणखी आहेत...