आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 वर्षांचे आहेत 'Bigg Boss', घरात सर्वांवर गाजवतात हुकूम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो गेल्या 11 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या या शोचे अकरावे पर्व छोट्या पडदयावर सुरु आहे.  'बिग बॉस चाहते है...' हे वाक्य तुम्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या प्रत्येक पर्वात नेहमी ऐकले असेल. परंतु 'बिग बॉस'च्या बॅकग्राऊंडमध्ये घूमणारा हा आवाज कुणाचा आहे, तुम्हाला माहिती आहे का? 'बिग बॉस'च्या घरात जो आवाज सदस्यांवर हुकूम चालवतो, अनेक कठीण टास्क करून घेतो, गरज पडली तर शिक्षाही देतो, तो आवाज व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अतुल कपूरचा आहे. अतुल कपूर हे 50 वर्षांचे आहेत. 


'बिग बॉस'च्या घरातच राहतात अतुल कपूर... 
- बातम्यांनुसार, 'बिग बॉस'च्या घरात अतुल कपूर यांची एक वेगळी खोली आहे, तिथे ते घरातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. 
- बिग बॉसमध्ये सहभागी झालेले स्पर्धक अतुल कपूर यांना भेटलेच नाहीत, असे नाही. अनेक एक्स कटेंस्टंट अतुल यांना भेटले आहेत. 
- याशिवाय अरबाज खान, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीसुद्धा अतुल कपूर यांच्यासोबत भेट झाली आहे.


हॉलिवूड चित्रपटांमध्ये अॅक्टिव आहेत अतुल... 
- अतुल कपूर यांचा जन्म 1966 मध्ये मुंबईत झाला. अतुल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. 
- हॉलिवूडच्या सिनेमांना हिंदीत डब करण्याचे काम अतुल कपूर करतात. डबिंगचे काम त्यांनी 2002 मध्ये सुरु केले. 
-  हॉलिवूड फिल्म 'आयरन मॅन', 'एवेंजर', 'कॅप्टन अमेरिका'सह अनेक गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनसाठी अतुल कपूर यांनी डबिंग केले आहे. 
- 2003 मध्ये त्यांना सोनी टीव्हीकडुन ऑफर आली. अतुल कपूर यांनी डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफीलाही आपला आवाज दिला आहे. 
- 2006 मध्ये सुरू झालेला भारतीय टीव्ही शो 'बिग बॉस'ला पहिल्या  पर्वापासुन अतुल कपूर आपला आवाज देत आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, रिअल 'बिग बॉस' अतुल कपूरचे PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...