आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 11: रात्रभर एकाच बेडवर झोपले होते हे कंटेस्टंट, सकाळी झाला खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस-11'मध्ये रोज काही ना काही मसाला अॅक्टिव्हिटी होत आहे. बुधवारी रात्रीच्या एपिसोडमध्ये प्रियंक शर्मा आणि बेनाफशा सुनावाला एकाच बेडवर झोपलेले होते. हे जव्हा घरातील इतर सदस्यांना कळाले तेव्हा विकास गुप्ताने प्रियंककडे याबद्दल विचारणा केली. तेव्हा तो म्हणाला, हे खरे आहे, आम्ही एकाच बेडवर झोपलो होतो. मात्र आमच्या दोघांचे पांघरुन वेगवेगळे होते. आणि आमच्या दोघात चुकीचे असे काहीही झालेले नाही. 

 

विकास म्हणाला - थप्पड लगावली असती... 
- प्रियंकने जेव्हा बेनाफशासोबत बेडे शेअर केल्याच्या मान्य केले तेव्हा विकास म्हणाला, मला जर हे तेव्हाच कळाले असते तर एक थप्पड लगावत तुला तिथून बाहेर काढले असते. 

 

हिना म्हणाली- तु असे करायला नको होते.. 
- हिना खाननेही प्रियंक-बेनाफशाच्या या हरकतीला हरकत घेतली. तिने दोघांनाही समजावले की तुम्ही असे करायला नको होते. हिना प्रियंकला म्हणाली, की तु बेनाफशाला तिच्या बेडवर जायला सांगू शकत होता. तेव्हा प्रियंकनेही तिचे म्हणणे मान्य केले. मात्र तिला एक मित्र म्हणून तेव्हा माझी गरज होती, असेही सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...