आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\'मध्ये पुनीष-बंदगीने केले लिपलॉक, कॅमेरामध्ये कैद झाले इंटिमेट सीन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसमध्ये बंदगी कालरा आणि पुनीष शर्मा एकमेकांना किस करताना दिसले. - Divya Marathi
बिग बॉसमध्ये बंदगी कालरा आणि पुनीष शर्मा एकमेकांना किस करताना दिसले.
मुंबई - 'बिग बॉस-11'मध्ये पुनीष शर्माने कॅप्टन झाल्याबरोबर कोणाचीही विशेष म्हणजे बिग बॉसच्या कॅमेरांचीही भीडभाड न ठेवता बंदगीसोबत इंटिमेट होण्यास सुरुवात केली आहे. वीकेंडच्या एपिसोडमध्ये दोघे एकाच बेडवर झोपत लिपलॉक करताना दिसले. दोघांचा रोमान्स घरातील लाइट बंद झाल्यानंतर बाकी कंटेस्टंट झोपल्याबरोबर सुरु झाला. एकदा पुनीषने बंदगीला प्रियंक शर्माच्या पाठीवर लोशन लावताना पाहिले होते, यामुळे त्याचा फार जळफळाट झाला होता. त्यानंतर आता पुनीषने बंदगीला किससाठी फोर्स केला होता.
 
शिल्पाला विकास म्हणाला 'सौतेली माँ'
- शोमध्ये विकास आणि शिल्पा शिंदे यांच्यात वारंवार तुतु-मैमै सुरु आहे. छोट्या-मोठ्या कारणांवरुन त्यांच्यात वाद होताना दिसतो. 
- अशातच काळकोठडीतून शिक्षा पूर्ण करुन डायनिंग टेबलवर जेवणासाठी आलेल्या विकाससोबत शिल्पाने वाद घालण्यास सुरुवात केली. 
- तेव्हा त्रस्त झालेल्या विकासने जेवण सोडले आणि म्हणाला, 'येथे नीट जेवणही करता येत नाही, शिल्पा एखाद्या सावत्र आई सारखी वागत आहे. नेमके जेवणाला बसल्यावर टोमणे मारायला सुरुवात करते.' 
- यावर मात्र शिल्पाने काहीही उत्तर दिले नाही. 
 
विकास झाला 'व्हिलन ऑफ द वीक' 
- विकेंडच्या वॉर एपिसोडमध्ये या आठवड्यात विकास गुप्ता घरातील व्हिलन झाला. 
- त्याने कटघऱ्यात उभे राहून कंटेस्टंट आणि होस्ट सलमान खानच्या प्रश्नांची उत्तरे दिली. 
 
'बिग बॉस-11'मधील या एपिसोडमधील काही निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...