आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 11: एकमेकांच्या श्रीमुखात भडकवत पुनीष-बंदगीचा झाला ब्रेकअप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुनीष शर्मा आणि बंदगी कालरा. - Divya Marathi
पुनीष शर्मा आणि बंदगी कालरा.

मुंबई - 'बिग बॉस-11' मध्ये दरवेळेस काही तरी अनोखे पाहायला मिळत आहे. काही एपिसोड प्रेमाच्या गुलाबी गप्पांमध्ये रंगलेले पुनीष शर्मा आणि बंदगी कालरा हे कपल घरातील सदस्यांसह प्रेक्षकांमध्येही चर्चेचा विषय झाले होते. या दोघांनी बेड शेअर केल्याचेही शोमध्ये दिसले होते. तर कधी बाथरुमध्ये दोघेच गेल्याचेही प्रेक्षकांनी पाहिले होते होते. यांच्या अशा वागण्यावर शोचा होस्ट सलमान खानही संतप्त झाला होता आणि त्याला यांना वॉर्निंग द्यावी लागली होती. आता या कपलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघे ब्रेकअपबद्दल बोलताना दिसतात, एवढेच नाही तर श्रीमुखात भडकवतानाही दिसत आहेत. 

 

व्हिडिओमध्ये असे आहे दोघांचे कनव्हर्सेशन 
- नुकतेच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पुनीष गाणे गात आहे आणि बंदगी त्याला म्हणते की सर्वांनाच आपल्या प्रेमाबद्दल प्रॉब्लेम आहे. आता आपण ब्रेकअप करु या. याला पुनीष गाण्यातून उत्तर देतो.. प्यार करने वाले कभी डरते नाही.... ! त्यावर बंदगी पुन्हा ब्रेकअपची रेकॉर्ड लावते. मग दोघे ब्रेकअपचा गेम खेळताना दिसतात. अखेर पुनीष, बंदगीच्या श्रीमुखात भडकवतो त्यावर ती म्हणते की ही चिटिंग आहे. त्यानंतर पुनीष म्हणतो की चल नव्याने खेळू या, तेव्हा बंदगी त्याला एक थप्पड लगावते आणि दोघे हसायला लागतात.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बिग बॉसच्या घरातील बंदगी-पुनीष... 

बातम्या आणखी आहेत...