आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\' कंटेस्टंटने यामुळे पँटमध्ये केली लघूशंका, झाला घराचा कॅप्टन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-11' मध्ये कंटेस्टंट पुनीष शर्मा पुन्हा एकदा या शोची हिस्ट्री रिपीट करताना दिसत आहे. बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सीजनमध्ये वेळोवेळी काही कंटेस्टंटने त्यात प्रियंका जग्गा, प्रिया मलिक आणि स्वामी ओम यांनी लज्जास्पद कृत्य केले होते, त्यांनी सर्वांसमोरच लघूशंका केली होती. असेच काही बिग बॉस सीजन 11मध्ये होताना दिसणार आहे. कंटेस्टंट पुनीष शर्मा सर्वांसमोर पँटमध्येच टॉयलेट करणार आहे. 
 
यामुळे पुनीष करणार सर्वांसमोर लघुशंका
- शोच्या आगामी एपिसोडमध्ये सर्व कंटेस्टंटमध्ये घराचा नवा कॅप्टन निवडण्यासाठी एक टास्क होणार आहे. या टास्कमध्ये घरातील सर्व कंटेस्टंटकडून कॅप्टनसीसाठी तीन नावे नॉमिनेट झाली आहे. त्यात बेनाफशा सूनावाला, हितेन तेजवानी आणि पुनीष शर्मा सहभागी होणार आहे. 
- कॅप्टनसी टास्कसाठी तिन्ही कंटेस्टंटला सायकलवर बसून सलग पाणी पित राहायचे आहे. असे करत असताना टॉयलेटला न जाता सायकलवर बसून सतत पाणी पित राहिल तो विजेता ठरणार आहे. 
- रिपोर्टनुसार, बेनाफशा आणि हितेन जास्तवेळ टॉयलेट रोखून धरू शकणार नाही आणि परिणामी ते टास्क सोडून बाहेर पडतील. 
- तर, पुनीष शर्मा माघार न घेता सायकलवर बसून पाणी पित राहाणार आहे आणि सर्वांसमोर लघूशंका करुन टास्क पूर्ण करेल व घराचा कॅप्टन होईल. 
 
घरात दुसऱ्यांदा कॅप्टन होणार पुनीष 
- पुनीष बिग बॉसचा एकमेव कंटेस्टंट आहे, जो दोनवेळा घराचा कॅप्टन होणार आहे. 
- याआधी विकास कॅप्टन असताना त्याने पुनीषवर हात उचलला होता, तेव्हा त्याला ही संधी मिळाली होती. 
- बिग बॉसने विकासला शिक्षा करताना त्याची कॅप्टनसी काढून पुनीषला दिली होती. तेव्हा तो रिप्लेसमेंट कॅप्टन होता आता मात्र तो पूर्णपणे जबाबदारी सांभाळणार आहे. 
 
रियालिटी शो विनर होता पुनीष 
पुनीषची बिग बॉस-11 मध्ये कॉमनर एंट्री झाली आहे. 
- याआधी त्याने 'सरकार की दुनिया' या  रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि तो विजेता ठरला होता. तेव्हा त्याला एक कोटी रुपये बक्षिस मिळाले होते. 
- हा शो बॉलिवूड अॅक्टर आशुतोष ऱाणाने होस्ट केला होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा पुनीष शर्माचे फोटो... 
बातम्या आणखी आहेत...