आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बिग बॉस\'मधून सलमानने काढून टाकली बिपाशा-करणच्या कंडोमची जाहिरात, हे आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 11' या वादग्रस्त रिअॅलिटी शोचा होस्ट सलमान खानने 'बिग बॉस'मधून बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांची कंडोमची जाहिरात काढून टाकली आहे. सलमानच्या मते, ही अतिशय बोल्ड जाहिरात आहे आणि त्याचे बिग बॉसच्या घरात प्रमोशन करणे योग्य नाही. सलमान म्हणाला, की हा शो लहान मुलेसुद्धा बघतात त्यामुळे या जाहिराताचे बिग बॉसमध्ये प्रमोशन करायला नको. सलमानने ब्रॉडकास्टर्सना बिपाशा आणि करण यांची कंडोमची जाहिरात काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. कलर्सनेसुद्धा सलमानचे म्हणणे ऐकले आहे. कारण सलमानचे म्हणणे त्यांना पटले आहे. शोमध्ये कंडोमची जाहिरात करणे म्हणजे सेक्सविषयी अवेअरनेस आणणे आहे. पण हा शो लहान मुलेसुद्धा बघत असल्याने शोचा कंटेंट क्लीन असायला हवा, या सलमानच्या मताशी कलर्स वाहिनी सहमत आहे. 


गेल्या महिन्यात रिलीज झाली होती जाहिरात..  
बिपाशा बसूने तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत गेल्या महिन्यात ही जाहिरात शूट केली होती. या जाहिरातीत दोघांचा अतिशय बोल्ड अंदाज बघायला मिळतोय. जाहिरातीचा व्हिडिओ बिपाशाने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करुन तिने कॅप्शन लिहिले होते. 'In a country that has the second largest population in the world.. we still have taboos on just the words sex and condoms... but not the actual act. Let’s talk more... read more and learn more about all the things that can be avoided just by the use of a simple precaution. With condoms you can have planned pregnancies and protected sex... which can curb HIV and STD cases. As a couple we believe in this that’s why we have thoughtfully endorsed it'. 


जाहिरातीत बिपाशा आणि करण सुंदर लोकेशन्सवर रोमान्स करताना दिसत आहे. व्हिडिओत करण काही सीन्समध्ये शर्टलेस तर बिपाशा अतिशय बोल्ड आउटफिटमध्ये दिसत आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, बिपाशा-करणच्या कंडोम अॅडचे काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...