आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss: सलमान खानच्या शोमधून बाहेर पडली हरियाणवी डान्सर सपना चौधरी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपना चौधरी बिग बॉसमधून एलिमिनेट झाली आहे. - Divya Marathi
सपना चौधरी बिग बॉसमधून एलिमिनेट झाली आहे.

मुंबई - हरियाणाची रागिनी गायिका-डान्सर सपना चौधरी यावेळी 'बिग बॉस-11' मध्ये एलिमिनेट झाली आहे. सपनासोबत शिल्पा शिंदे, प्रियंक शर्मा आणि हिना खान या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट आहेत. रिपोर्ट्सनुसार सपनाला सर्वात कमी व्होट मिळाले आहे आणि होस्ट सलमान खानने 'वीकेंड का वार' मध्ये सपनाच्या एलिमिनेशनची घोषणा केली आहे. सपना 1 ऑक्टोबरला शोच्या प्रीमियर वेळी घरात दाखल झाली होती आणि गेल्या 8 आठवड्यांपासून घरात होती. 

 

कारण नसताना इतरांशी भांडत होती सपना 
- बिग बॉसच्या घरात 8 आठवडे राहिलेली सपना प्रत्येक कंटेस्टंटसोबत विनाकारण भांडताना दिसत होती. छोट्या-छोट्या गोष्टींचा मोठा इश्यू करुन त्यावरुन ती वाद वाढवत होती. 
- काही दिवसांपूर्वीच हिना खान तिची चांगली फ्रेंड झाली होती. मात्र अशी माहिती आहे, की सपनाच्या फॅन्सला ही मैत्री आवडलेली नव्हती. 
- नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये कोर्ट रुम टास्कमध्ये बंदगी कालरा आणि पुनीष शर्मासोबत तिचा वाद झालेला पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे घरातील सर्वात शांत कंटेस्टंट ज्याला म्हटले जाते त्या हितेन तेजवानीसोबतही सपनाचे वाजले होते. 
- अर्शी खानच्या पुणे स्कँडलचा बिग बॉसच्या घरात भांडाफोड करणारी दुसरी कोणी नसून सपना चौधरीच होती. अर्शीच्या पर्सनल लाइफवर तिच सर्व प्रथम बोलली होती. 
- सपनाचे अचानाक घरातून बाहेर पडणे तिच्या चाहत्यांना धक्काच आहे. कारण सपना घरातून बाहेर पडण्याची शक्यता फार कमी होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये जाणूुन घ्या सपना चौधरी बद्दल.. 

बातम्या आणखी आहेत...