आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: अॅक्ट्रेसचा दावा - विकाससोबत सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये होती \'भाभीजी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'बिग बॉस\'च्या लक्झरी टास्क दरम्यान विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे पुन्हा एकदा भांडताना दिसले. - Divya Marathi
\'बिग बॉस\'च्या लक्झरी टास्क दरम्यान विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे पुन्हा एकदा भांडताना दिसले.
मुंबई - 'बिग बॉस-11'मध्ये बुधवारी कुशन विक्रीच्या टास्कमध्ये कंटेस्टंट विकास गुप्ताची टीम विजयी झाली तर 'भाभीजी' अर्थात शिल्पा शिंदेची टीम पराभूत झाली होती. दरम्यान, कंटेस्टंट अर्शी खान आणि प्रियंक शर्माबद्दल खुलासा करणारी अॅक्ट्रेस गहना विशिष्ठने पुन्हा एकदा शॉकिंग माहिती उघड केली आहे. गहनाचा दावा आहे, की विकास आणि शिल्पा दोघे रिलेशनशिपमध्ये होते. 
 
गहना वशिष्ठने आशिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की शिल्पा आणि विकास बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. 'भाभीजी घर पर है' शो दरम्यान दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र ही बाब त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवली होती. 
- गहना म्हणाली, 'विकास आणि शिल्पा एकमेकांच्या फार क्लोज आहेत. एक काळ असा होता की या दोघांची फिजिकल रिलेशनशिप होती. 'भाभीजी...' मधून शिल्पा बाहेर पडण्याचे कारण विकासच होता, हे शिल्पाच म्हणाली होती.'
- गहनाच्या म्हणण्यानुसार, 'विकासला त्याचा जॉब प्रिय होता आणि तो शिल्पासोबतच्या रिलेशनशिपकडे फक्त फिजिकल अँगलनेच पाहात होता. मात्र शिल्पा त्याच्यासोबत इमोशनली अटॅच झाली होती. त्यामुळेच त्यांचे हे नाते पुढे टिकू शकले नाही.'
- नंतर शिल्पाला शोमधून काढल्यानंतर तिला वाटत होते की विकास तिला साथ देईल मात्र तसे झाले नाही. तो चॅनलच्या बाजूने उभा राहिला. 
- गहनाचे म्हणणे आहे, 'कलर्स चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस एंडमोल यांना शिल्पा आणि विकासच्या फिजिकल रिलेशनशिपबद्दल सर्वकाही माहित आहे, त्यामुळेच या दोघांना एकाच सीजनमध्ये घेण्यात आले आहे.' 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विकास आणि शिल्पाचे भांडण... 
बातम्या आणखी आहेत...