आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: प्रोड्यूसरच्या सेक्श्युयालिटीवर प्रश्नचिन्हं, आल्या आहेत गे असल्याच्या बातम्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-11' च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन प्रोसेस करण्यात आली. यावेळी शिल्पा शिंदे, हिना खान, ज्योती कुमारी आणि झुबेर खान यांना नॉमिनेट केले. पण नंतर पडोसी कंटेस्टंट म्हणजे शेजाऱ्यांना एकाला वाचवून दोघांना नॉमिनेट करण्याची संधी मिळाली. त्यांनी हिनाला सेफ करत अर्शी खान आणि बंदगी कालराला नॉमिनेट केले. याचवेळी कंटेस्टंटबाबत बोलताना आकाशने विकासच्या सेक्श्युयालिटीवर कमेंट केली. 

काय म्हणाला आकाश.. 
- एपिसोडमध्ये कंटेस्टेंट आकाश ददलानीने कॉन्फरन्स टेबलवर सर्वांबाबत एक चांगली आणि वाईट बाब सांगितली. 
- त्यावेळी जेव्हा विकास गुप्ताचा क्रमांक आला तेव्हा आकाशने त्याच्या सेक्श्युयालिटीवर प्रश्न उपस्थित केला. 
- आकाशने त्याला 'मॅन फेमिनाइन' म्हटले. तसेच हा काही अपमान नाही, फक्त काही लोकांना ते वाईट वाटते असेही म्हटले. 
- आकाश असेही म्हणाला की, विकासची सेक्श्युयालिटी हा काही चर्चेचा विषय नाही. पण याबाबत बोलणे हेही चुकीचे नाही असेही तो म्हणाला. 
- आकाश आणि विकास यांच्यात नंतर या गोष्टीवरून काही वादही झाला. नंतर प्रियांक आणि बेनाफशा यांनी त्याला समजावले. 
- विकास यापूर्वीही त्याच्या अनेक मेल फ्रेंड्समुळे चर्चेत राहिला आहे. इंडस्ट्रीमध्ये तो गे असल्याच्या चर्चाही होत्या. 

शेजाऱ्यांवर भडकली अर्शी 
- नॉमिनेशनच्या प्रोसेसमध्ये आधी अर्शीला एकाही कंटेस्टंटने नॉमिनेट केले नव्हते. पण शेजाऱ्यांमुळे ती सेव्ह होण्याऐवजी डेंजर झोनमध्ये आली. 
- शेजाऱ्यांनी अर्शीला नॉमिनेट करण्यामागे तिची बोलण्याची पद्धत आणि भाषा अशी कारणे सांगितली.  
- त्यानंतर जेव्हा शेजाऱ्यांच्या घरातून मुख्य घरात चहा पाठवण्यासाठी फोन आला तेव्हा अर्शी फोनवरच भडकली आणि रागाने चहा द्यायला नकार दिला. 

गाढवाला सांभाळणार कंटेस्टंट.. 
- अपकमिंग एपिसोडमध्ये आकाश अॅक्टीव्ही एरियात दिसणार आहे. 
- घरातील सदस्यांना एक टास्क दिले जाणार आहे. त्यात त्यांना गाढवाची काळजी घ्यायची आहे. 
- यादरम्यान आकाश गाढवाला अंघोळ घालताना, त्याच्याशी बोलताना पाहायला मिळणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, दुसऱ्या एपिसोडचे काही निवडक PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...