आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमध्ये ढिंचॅक पूजाला लागली विकासच्या नावाची हळद, हिनाची याच्यासोबत झाले तुतु-मैमै

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढिंचॅक पूजा आणि लव त्यागीला हळद लावत त्यांचे नाते पक्के करताना कंटेस्टंट. - Divya Marathi
ढिंचॅक पूजा आणि लव त्यागीला हळद लावत त्यांचे नाते पक्के करताना कंटेस्टंट.
मुंबई - 'बिग बॉस-11'मध्ये लव त्यागी घराचा कॅप्टन झाला आणि त्याचे ढिंचॅक पूजासोबत लिंकअप झाल्याच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. तर बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंट देखील या दोघांच्या टांग खेचण्यात मागे नाहीत. प्रियंक शर्मा,  सब्यसाची सतपती, अर्शी खान, हितेन तेजवानी यांनी तर पूजा आणि लव त्यागीची हल्दी सेरेमनीही आयोजित केली. यात घरातील इतर सदस्यांनी या दोघांना हळद लावून पिवळे केले आणि जणूकाही यांचे नातेच पक्के करुन टाकले. 
 
विकासने हिनाला म्हटले 'लोमडी' 
- 'बिग बॉस'मध्ये सकाळी-सकाळी विकासने हिना खानसोबत पंगा घेतला होता. 
- अलार्म वाजल्यानंतर हिना परत झोपी गेली होती. तेव्हा त्याने बिग बॉसला सांगून तिला जागे केले होते. 
- हे करत असताना विकास म्हटला होता, की हिना घरातील चालाक लोमडी आहे, आणि तिला घरातील सर्व कंटेस्टंट घाबरतात. 
- तर, हिनानेही विकासला मोकळे सोडले नाही तिने त्याला मास्टरमाइंड म्हटले. तेव्हा दोघांमध्ये थोडी तुतु-मैमै झाल्याचे पाहायला मिळाले. 
 
कंटेस्टंटचा झाला लक्झरी टास्क 
- शोमध्ये कंटेस्टंटला एक टास्क देण्यात आला होता. त्यांनी व्यापारी बनून उषी-तकिया तयार करुन त्याची विक्री करायची असा हा टास्क होता. 
- या टास्कसाठी शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. इतर कंटेस्टंटने तकिया तयार करुन पैसे कमावले. 
 
पुढील स्लाइडमध्ये क्लिक करुन पाहा, असा होता घरातील नजारा...
बातम्या आणखी आहेत...