आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बिग बॉस\'च्या घरातून बेघर झाली बेनाफशा! सनीने कंटेस्टंटला दिला हा मजेदार टास्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनीने प्रत्येक कंटेस्टंटला काही ना काही टास्क दिला. - Divya Marathi
सनीने प्रत्येक कंटेस्टंटला काही ना काही टास्क दिला.

मुंबई - 'बिग बॉस-11'मध्ये या आठवड्यात तीन कंटेस्टंट नॉमिनेटेड झाले होते, त्यात बेनाफशा सुनावाला, हिना खान आणि सपना चौधरी. यात बेनाफशा सुनावाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. याची अनाऊन्समेंट सलमान खानने रविवारच्या एपिसोडमध्ये केली. 

 

शोमध्ये पोहोचले सनी लिओनी-अरबाज खान 
- सनी लिओनी आणि अरबाज खान यांची अपकमिंग फिल्म 'तेरा इंतजार'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात पोहोचले होते. 
- सनीने यावेळी घरातील सर्व सदस्यांना एक मजेदार टास्क दिला होता. त्याचे नाव होते, 'थोड़ा खाओ थोड़ा लगाओ'. 
- सनीने शिल्पा शिंदेला विचारले, की घरातील सर्वात बोअरिंग मेंबर कोण आहे? त्यावर शिल्पाने थोडाही वाट न पाहाता सपनाचे नाव घेतले. तेव्हा सपनाला चिली सॉस प्यावा लागला. 
- सनी दुसऱ्या क्रमांकावर कंटेस्टंट विकासला बोलावते आणि त्याच्याकडे चॉकलेट सॉस देत विचारते की घरात सर्वात स्वीट कोण आहे? विकास, हिनाचे नाव घेतो आणि तिच्यावर चॉकलेट सॉस टाकतो. 
- तिसऱ्या क्रमांक लागतो अर्शी खानचा . तिला बटर पर्सनचे नाव विचारले जाते. त्यानंतर हितेनच्या संपूर्ण बॉडीवर बटर लावले जाते. 
- या टास्कमध्ये हिना, विकासच्या डोक्यावर अंडी फोडते, तर आकाश ददलानीला केळीचा हार घातला जातो. या मजेदार टास्क नंतर सनी निघून जाते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सनीच्या टास्कवरील कंटेस्टंटच्या मजेदार रिअॅक्शन... 

बातम्या आणखी आहेत...