आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 7:नातेसंबंधांवरुन रतन आणि प्रत्युषामध्ये तू तू-मैं मैं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सातव्या पर्वाच्या तिस-या दिवशी अनिता अडवाणीने तिच्या आणि राजेश खन्ना यांच्या नातेसंबंधांविषयी काही रहस्य उघड केले, तर चौथ्या दिवशी रतन राजपूत आणि प्रत्युषा बॅनर्जी यांच्यात कॅटफाईटला सुरुवात झाली. या दोघींमध्ये नातेसंबंधांवरुन चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली.
रतनच्या मते, काही लोक दोन वर्षे एकत्र राहुनसुद्धा एकमेकांना समजू शकत नाहीत. रतनची हीच गोष्ट प्रत्युषाला खटकली आणि तिने रतनला याचे चोख उत्तर (प्रत्युषा रतनला काय म्हणाली हे पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या) दिले.
रतन राजपूतने टीव्हीवर स्वयंवराचा घाट घालूनसुद्धा लग्न केले नाही, तर बालिका वधू या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या प्रत्युषाचेही अलीकडेच बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप झाले. कदाचित यामुळेच रतनच्या बोलण्यावर दोघींमध्ये तू तू मैं मैं रंगली.
रतन आणि प्रत्युषा यांच्यातील खडाजंगीबरोबरच बिग बॉसच्या गुरुवारच्या भागात एक ट्विस्टही बघायला मिळाला. जन्नत आणि जहन्नूममध्ये स्पर्धकांची अदलाबदलीसुद्धा बघायला मिळाली.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बिग बॉसच्या घरात चौथ्या दिवशी काय झाले आणि बघा काही निवडक छायाचित्रे...