आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो भारतातील सर्वाधिक गाजत असलेला शो आहे. या शोमध्ये रिअॅलिटीबरोबरच ग्लॅमरचाही तडका आहे. या शोमधून सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची झलकसुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळत असते.
मात्र सर्वाधिक रंजक असतं ते या शोमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रींना बघणं. बिग बॉसच्या या पर्वात अनेक अभिनेत्री सहभागी झाल्या आहेत. हेजेल कीच, गौहर खान, प्रत्युषा बॅनर्जी, रतन राजपूत, काम्या पंजाबी, शिल्पा सखलानी आणि एली अवराम या अभिनेत्री बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात सहभागी झाल्या आहेत. या सर्वच जणी एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री आहेत.
तसे पाहता या सर्व जणींना त्यांचे फॅन्स पडद्यावर नेहमी मेकअपमध्येच बघत असतात. मात्र बिग बॉसच्या घरात या सर्वजणी चक्क विदाऊटमेकअपमध्ये दिसत आहेत. जे प्रेक्षक नियमितरित्या बिग बॉस बघतात, त्यांना ठाऊक आहे की शोदरम्यान या अभिनेत्री फार कमी मेकअपमध्ये दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचं खरं रुप बघायला मिळतं.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेत्रींची विदाऊट मेकअपची छायाचित्रे दाखवत आहोत.
बघा तुमच्या या आवडत्या अभिनेत्री विदाऊट मेकअप दिसतात तरी कशा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.