भारतातील सर्वात मोठा रिअँलिटी शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसच्या सातव्या पर्वाचा एक आठवडा पूर्ण झाला आहे. 90 दिवसांच्या तुलनेत अद्याप फार कमी काळ लोटला आहे. मात्र रंचक गोष्ट म्हणजे एवढ्या कमी दिवसांतच बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना ड्रामा बघायला मिळाला. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची एकमेकांशी चांगली ओळख झाली आहे.
या सहा दिवसांत सर्व स्पर्धकांमधून एकाची निवड घरातील कॅप्टनच्या रुपात झाली आहे. नॉमिनेशनच्या माध्यमातून एका स्पर्धकाला बिग बॉसने बाहेरचा रस्तासुद्धा दाखवला. याशिवाय जन्नत आणि जहन्नूममध्ये स्पर्धकांची बदलीसुद्धा झाली. सोबत सेलिब्रिटींमध्ये रंगणारी कॅट फाईट ही बघायला मिळतच आहे. केवळ 6 दिवसांतच दोन्ही घरांत चांगलच राजकारण रंगायला सुरुवात झाली.
या स्पेशल पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com आपल्या वाचकांना बिग बॉसच्या सातव्या पर्वाच्या सुरुवातीच्या सहा दिवसांत घडलेल्या कॉन्ट्रोव्हर्सीजबद्दल सांगत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 6 दिवसांत किती बदलले बिग बॉसच्या घरातील वातावरण...