आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 7:अश्लील थट्टा करुन अरमानने केला एलीचा अपमान, जाब विचारणार सलमान ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉस सीझन 7च्या पाचव्या दिवशी घरात भरपूर ड्रामा बघायला मिळाला. एकीकडे जहन्नूममधील सदस्य गौहर खानबरोबर अँडजस्ट होताना दिसले तर दुसरीकडे अरमानने केलेल्या अश्लील थट्टेमुळे एलीच्या डोळ्यात अश्रू आले. या अपमानामुळे खचलेल्या एलीने प्रत्युषाला सांगितले, की कधीच कुणी तिचा असा अपमान केलेला नाही. काही वेळाने अरमानने एलीची माफी मागितली आणि प्रकरण शांत केले. मात्र याबाबत अरमानला सलमान खान जाब विचारण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी घडलेली रंजक गोष्ट म्हणजे बिग बॉलने जन्नतमध्ये राहणा-या सदस्यांना त्यांना हव्या असलेल्या वस्तू दिल्या. याशिवाय गौहर खान आणि प्रत्युषा बॅनर्जी यांच्यात झालेला वादही चर्चेचा विषय ठरला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा कसा राहिला बिग बॉसच्या घरातील पाचवा दिवस...