आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमान-तनिषामध्ये दुरावा : 'जवळीक साधण्याचा प्रयत्न करु नको', तनिषाने अरमानला बजावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या घरात सध्या युद्ध सुरु आहे. तसे पाहता या घरात नित्यनेमाने सर्व सदस्य एकमेकांशी भांडताना दिसतात. मात्र सध्या चित्र काही वेगळे आहे. सर्व स्पर्धकांना बिग बॉसने एक लग्झरी बजेट टास्क दिला आहे. यामध्ये सर्व सदस्यांना कमांडोची भूमिका देण्यात आली आहे. यामध्ये शत्रूने केलेल्या हल्ल्यातून सदस्यांना माउंट बिग बॉसचा बचाव करायचा आहे.
घरातील गार्डन एरिया युद्ध क्षेत्रात बदलला आहे आणि घरातील सदस्य शत्रूबरोबर सामना करत आहेत. गार्डनच्या बाहेरच त्यांची खाण्या-पिण्याची आणि झोपण्याची सोय करण्यात आली आहे. घरातील सर्व सदस्यांना घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
टास्क संपल्यानंतर संध्याकाळी जेव्हा तनिषा अँडीबरोबर गप्पा मारत होती, तेव्हा अरमानने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावर तनिषाने अरमानला खडे बोल सुनावले.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...