गोहर खान शेवटी 'बिग बॉस 7'ची विजेती झाली. तिला 50 लाखांचे बक्षिस मिळाले आहे. शनिवारी रात्री लोणावळा येथे बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडला. गोहरने तनिषाला मात देऊन हा शो जिंकला. फिनालेला गोहरची आईसुध्दा उपस्थित होती. गोहरच्या आईने यावेळी सांगितलं, की गोहरच्या विजयाचा तिला खूप आनंद झाला आहे. त्याचवेळी गोहरची बहिण निगार खानने गोहरवर अभिमान असल्याचं सांगितलं आणि गोहरची आई तिच्या विजयाने भावुक झाली होती. गोहर शोची मजबूत विजेती स्पर्धक मानली जातं होती. बिग बॉसच्या घरात गोहरने 104 दिवस घालवले होते. शनिवारी फायनलच्या दरम्यान पूर्ण दिवस घराच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू होती. गोहरने बिग बॉसच्या घरात 15 सप्टेंबरला 14 इतर सेलिब्रिटींनी प्रवेश केला होता. नंतर शोमध्ये 5 स्पर्धकांना वाइल्ड कार्ड एंट्रीने घरात प्रवेश मिळाला होता, ज्यामध्ये टॉप 3 फायनिलस्ट होते यात एजाज खानसुध्दा सामील होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहिती...