आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss Analysis: स्पर्धकांनी अशाप्रकारे उडवली एकमेकांची टिंगल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डिआंड्राच्या लूकमध्ये प्रीतम आणि सुशांतच्या लूकमध्ये पुनीत)
मुंबई: 'बिग बॉस'चा प्रत्येक टास्क स्पर्धकांना एकमेकांविरोधात भडकवण्यासाठी ठेवला जातो. रविवारीच्या (12 ऑक्टोबर) दिवशीची सुरुवातच अशा एका टास्कने झाली. त्यामध्ये सर्व स्पर्धक एकमेकांची मिमिक्री करताना दिसले. 'बिग बॉस'ने एक फनी टास्कची घोषणा केली होती. या टास्कचे नाव 'एक था घर' होते. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना एकमेकांची भूमिका साकारून मिमिक्री करायाची होती. सर्व स्पर्धकांनी 'वक्त ने किया क्या हसी सितम' गाण्यावर डान्स केला. हे गाणे त्यांच्या परिस्थितीला व्यक्त करत होते.
या टास्कमध्ये अनेक गमतीशीर क्षण पाहायला मिळले. टास्कदरम्यान प्रीतमने डिआंड्राची भूमिका साकारली आहे. मिनिषा करिश्मा तन्ना बनला होता. शिवाय, पुनीत सुशांत बनला होता. करिश्मा पुनीतचे पात्र साकारले होते. प्रनीत भट्ट गौतमच्या अवतारात दिसला. सोनाली बनली नताशा, गौतम बनला सोनाली, डिआंड्रा बनली आर्य, सोनी बनली प्रीतम, दीपशिखा बनली प्रीतम, नताशा दिसली उपेनच्या भूमिकेत, सुशांत बनला दीपशिखा आणि उपेनने साकारले सोनीचे पात्र. हे सर्व एकमेकांच्या भूमिका साकारून मिमिक्री करताना दिसले. आर्यसुध्दा मिनिषाची मिमिक्री करताना दिसला. 'बिग बॉस'ने त्यांना प्रेक्षकांना व्होटींगसाठी अशाच अवतारात आपील करायला सांगितली.
मिनिषा आणि करिश्मा यांच्यात पहिल्यापासून कटूता आहे. 'एक था घर' टास्कमध्ये मिनिषाने करिश्माची जी खिल्ली उडवली, ती त्यांच्या कटूतेमध्ये आणखी भर टाकण्याचे काम करणार आहे. प्रणित आणि गौतम यांच्यातील संबंधही एवढे चांगले नाहीत. प्रणितने गौतम बनून त्याच्या उडवलेल्या खिल्लीचा परिणाम त्यांच्या नात्यात होणार आहे. आता बोलूया आर्यविषयी,
आर्य टास्कदरम्यान मिनिषाच्या गेट-अपमध्ये दिसली होता.
शनिवारीच्या (11 ऑक्टोबर) एपिसोडमध्ये आर्य आणि मिनिषा यांच्यात बराच वाद झाला होता. त्यानंतर दोघे एकमेकांवर भडकले होते आणि आता आर्यने मिनिषाचा गेट-अप करून पायावर कु-हाड मारून घेतली आहे. इतर स्पर्धकांमध्ये सर्वकाही ठिक दिसून आले. त्यामुळे या टास्कचा त्यांच्या संबंधांवर काही परिणाम पडू शकतो असे वाटत नाहीये.
रेखा यांचे आगमन
21व्या दिवशी अर्थातच रविवारी वीकेंड का वॉर अंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री रेखा 'बिग बॉस'च्या घरात आल्या होत्या. त्यांनी घरात येऊन 'सुपर नानी' सिनेमाचे प्रमोशन केले. रेखा यांनी यादरम्यान सलमानसोबत 'दबंग 2'च्या 'दगाबाज' गाण्यावर डान्स केला. सलमानने यावेळी सांगितले, की तो लहान असताना रेखा योगा शिकवत असताना सलमान त्यांना बघण्यासाठी जात होता. रेखा यांनीसुध्दा सांगितले, की सलमान 6-7 वर्षांचा असताना त्यांच्या मागे-मागे फिरत होता. दोघांनीही जून्या आठवणींना उजाळा दिला.
रेखा यांनी घेतले बिग बींचे नाव
सलमानने रेखा यांना 'दबंग' सिनेमातील सोनाक्षी सिन्हाचा प्रसिध्द डायलॉग 'थप्पड़ से डर नहीं लगता...' म्हणण्यास सांगितला. रेखा यांनी डायलॉग म्हणण्यास सुरुवात केली, मात्र त्यांच्या तोंडून बिग बींचे नाव बाहेर पडले. रेखा यांनी हा डायलॉग काहीशा अशा अंदाजात म्हटला, "थप्पड से डर नही लगता है साहब, प्यार से भी डर नही लगता है , वो तो मै बेइन्तहा कर सकती हू.... और मुझे डर लगता है तो सिर्फ एक ही चीज से...बिग बी से... 'बिग बॉस' से डर लगता और उससे भी ज्यादा डर लगता है टीवी से...बहुत डर लगता है.
सलमान रेखा यांच्यासाठी 'मान बाबा'
रेखा यांनी शोमध्ये सांगितले, की सलमान त्यांच्यासाठी एक लहान मुलगा आहे आणि त्या त्याला नेहमी मान बाबा म्हणून बोलावतात.
स्पर्धकांना मिळाला टास्क
रेखा यांच्या उपस्थितीत स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. या टास्कचे नाव 'मै भी रेखा' होते. टास्कदरम्यान फिमेल कंन्टेस्टंट्सना रेखा यांच्य हिट गाण्यांवर डान्स आणि अभिनय करायचा होता. तसेच मेल कन्टेस्टंट्सना त्यांना प्राभावित करायचे होते. टास्कनंतर रेखा यांनी घरात जाऊन स्पर्धकांची भेट घेतली आणि सुशांतला एक साडी भेट म्हणून दिली.
दीपशिखाचे एलिमिनेशन-
या आठवड्यातील एलिमिनेशनसाठी पाच लोकांचे नॉमिनेशन झाले होते. आर्य, प्रीतम, गौतम आणि सोनाली यावेळी एविक्ट होण्यापासून वाचल्या. मा६, दीपशिखाचा प्रवास या आठवड्यात संपुष्टात आला आणि तिला घराबाहेर जावे लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'एक था घर' टास्कदरम्यान स्पर्धकांचे लूक्स...