आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 8: दीपशिखा झाली एलिमिनेट, वाचा घराबाहेर पडल्यानंतर काय म्हणाली?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'मध्ये सलमानसोबत दीपशिखा)
मुंबई: 'बिग बॉस'मध्ये या आठवड्यात दीपशिखा नागपाल घरातून बाहेर झाली आहे. सुकिर्ती कांडपालनंतर ती दुसरी स्पर्धक आहे, जी एलिमिनेट झाली. या आठवड्याच्या एलिमिनेशनसाठी पाच स्पर्धकांचे नॉमिनेशन झाले होते. त्यामध्ये आर्य बब्बर, प्रीतम, गौतम गुलाटी आणि सोनाली सुरक्षित राहिले. परंतु प्रेक्षकांच्या व्होटवर आधारित दीपशिखा घराबाहेर झाली आहे.
एविक्शननंतर divyamarathi.comने दीपिशिखासोबत बातचीत केली आणि शोमध्ये मिळेलेले अनुभव जाणून घेतले. दीपशिखाने सांगितले, 'माझा प्रवास खूप छोटा होता. परंतु रंजकही होता. येथे डिआंड्रा, करिश्मा आणि मिनिषासारख्या मैत्रीणी मला मिळाल्या. परंतु पुनीत इस्सरच्या वागणूकीने मी परेशान झाले. मला विश्वास बसत नव्हता, की त्याने मला नॉमिनेट केले होते.
आम्ही सर्वांनी शोमध्ये मनोरंजन करण्याच्या उद्देशाने एंट्री केली होती. म्हणून मला कुणीविषयीच तक्रार नाहीये.'
एविक्शनच्या दिवशी समोर आलेल्या आर्य आणि मिनिषाच्या प्रकरणाविषयी दीपशिखा सांगते, 'मिनिषाने याविषयी मला सांगितले होते. मी तिला शांत बसण्यास सांगितले होते. तिला समजावून सांगितले होते, की पुढील दिवसांत याचा त्रास होऊ शकतो. पुनीसनेसुध्दा तिला असाल सल्ला दिला होता.'
दिपशिखाला विचारण्यात आले, की तिला पुन्हा घरात जाण्याची तिला संधी मिळाली इच्छा आहे का? यावर ती सांगते, 'हो नक्कीच, हा खूपच रंजक शो आहे आणि मला संधी मिळाली तर मी पुन्हा घरात एंट्री करेल.'