(करिश्मा तन्ना)
मुंबई- टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री पडद्यावर मेकअपमध्ये दिसतात. मात्र '
बिग बॉस' असा एक रिअॅलिटी शो आहे, जिथे अभिनेत्रींचा विना मेकअप लूक बघायला मिळतो. मेकअपमुळे ज्या अभिनेत्री वयापेक्षा लहान दिसतात, त्याच अभिनेत्रींचे विना मेकअप खरे वय उघड होते.
बिग बॉसच्या आठव्या पर्वात ग्लॅमर इंडस्ट्रीतील महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. करिश्मा तन्नाला वगळता सर्वजणी शोमधून एलिमिनेट झाल्या. मात्र पहिल्या दिवसापासून ते ग्रॅण्ड फिनालेपर्यंत करिश्मा या स्पर्धेत टिकून राहिली.
divyamarathi.com ने 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांच्या विना मेकअपच्या छायाचित्रांचे कलेक्शन केले आहे. या स्पर्धकांचे ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस रुप तुम्हाला येथे बघायला मिळणार आहे.
स्पर्धकांचे नावः करिश्मा तन्ना
व्यवसायः टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री
करिश्मा तन्ना टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'देश में निकला होगा चांद, 'कोई दिल मैं है', 'प्यार के दोन नामः एक राधा एक श्याम' या मालिकांमध्ये करिश्माने काम केले आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या विवेक ओबरॉय, आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख स्टारर 'ग्रॅण्ड मस्ती' या सिनेमात करिश्माने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. लवकरच तिचा 'टीना आणि लोलो' हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शोमध्ये सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांची विनामेकअप लूकची छायाचित्रे...