आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look: Bigg Boss 8ला अशा अंदाजात होस्ट करणार फराह खान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फराह खान 'बिग बॉस'च्या होस्टच्या रुपात)
मुंबई- दिग्दर्शिका फराह खान 'बिग बॉस 8'मध्ये सलमान खानला रिप्लेस करणार आहे. होस्ट म्हणून शोमध्ये तिचा फस्ट लूक समोर आला आहे. हा लूक पाहून जाणवते, की फराह शोमध्ये एका कडक शिक्षिकेप्रमाणे दिसणार आहे.
सांगितले जाते, की सलमान खानच्या स्पेशल एपिसोड्सला 'वीकेंड का वार' म्हणून ओळखले जाते. तसेच, फराह खानच्या एपिसोड्सला 'फराह खान की क्लास' म्हणून ओळखले जाणार आहे. फराह आपल्या सदस्यांसोबत कडक स्वभावाने वागणार आहे. तसेच, ती प्रेक्षकांचे मनोरंजनदेखील करणार आहे.
'बिग बॉस'मध्ये सलमान खानचा करार पूर्ण झाला आहे. तो आपल्या 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगमध्ये बिझी होणार असल्याने तो 'बिग बॉस' होस्ट करू शकणार नाही. त्यामुळे शोची होस्ट म्हणून फराह खानला साइन करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा गौतम दिसणार सिनेमात आणि इश्कमिजाज एजाज...